विशेष प्रतिनिधी
नाशिक : जानेवारी महिना संपत आला तरी अवकाळी पावसाचा जोर कमी झालेला नाही. येत्या २३ व २४ जानेवारीला कोकणासह उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तज्ज्ञांंच्या मते, ला निना परिस्थिती निर्माण झाल्यानेच हवामान बदलले आहे. तसेच कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत असून हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. Warning of unseasonal rains in North Central Maharashtra on 23rd and 24th January
नववर्षाच्या सुरुवातीला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही अवकाळीची नोंद झाली होती. हा जोर पुढे कायम राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला होता. याचाच परिणाम कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या २३ व २४ जानेवारीला नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, रत्नागिरी, अहमदनगर, जळगाव या भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पॅसिफिक महासागर हा पृथ्वीवरील सर्वांत मोठा महासागर आहे. तेथील वारे आणि प्रवाहांचा जगावर थेट परिणाम होताना दिसतो. त्यात दक्षिण गोलार्धात भूभाग कमी असल्याने प्रशांत महासागराच्या दक्षिण भागातील तापमान जगाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. यालाच सदर्न ऑसिलेशन असे म्हणतात. ला निनाच्या प्रभावामुळे पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान कमी होते. त्याचा परिणाम फक्त या भागातच नाही तर शेजारी असलेल्या हिंदी महासागरातील सागरी प्रवाहावर आणि वाऱ्यांवर म्हणजे मान्सूनवर होतो. पर्यायाने ला-निनाच्या काळात भारतात नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडतो. ला-निनाच्या प्रभावामुळे एकूणच उत्तर गोलार्धात तापमानही कमी होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App