SOLAPUR : पुरस्कारानंतर तिरस्कार! डिसले गुरूजींची व्यथा ! देशाच्या शिक्षण क्षेत्राची मान उंचवणाऱ्या गुरुजींचा राज्यात शिक्षण अधिकाऱ्यांकडून छळ!


  • सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर झाली …
  • आणि ग्लोबल टीचर अॅवार्ड मिळाल्यापासून शिक्षण विभागातल्या काही अधिकाऱ्यांनी त्रास दिला आहे.
  • ग्लोबल टीचर अॅवार्ड विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले सरकारी शिक्षकाची नोकरी सोडण्याच्या मनस्थितीत आहेत.
  • अमेरिकेतील फुलब्राईट स्कॉलरशिपची संधी हुकणार? 

विशेष प्रतिनिधी

सोलापूर : ज्या व्यक्तीला अमेरिकेची स्कॉलरशिप मिळते, ज्या व्यक्तीला ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाला आहे, त्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वावर आक्षेप घेण्यात आले आहेत. त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.हे आरोप केलेत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी. सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉ. लोहार यांनी अमेरिकेची स्कॉलरशिप मिळालेले ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त रणजितसिंह डिसले यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. SOLAPUR: Contempt after award! Disley Guruji’s grief! Guruji, who uplifted the dignity of the country’s education sector, was persecuted by education officials in the state!

रणजित डिसले यांनी अमेरिकेत जाण्यासाठी अध्ययन रजा तसंच परदेश प्रवासाची अनुमती मिळावी, यासाठी अर्ज केला होता.त्यांच्या अर्जात त्रुटी असल्याचं सांगत शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर काही गंभीर आरोपही केले आहेत. त्यांनी पैशाची मागणी केलीएवढंच नाही तर फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी केलेल्या अर्जावरही अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळं फुलब्राईट स्कॉलरशिपही हातातून जाण्याची शक्यता आहे असं डिसले गुरुजींनी सांगितलंय.

हे सांगताना डिसले गुरुजींच्या डोळ्यात पाणी आलं होतं. सरकारी नोकरीत होणाऱ्या त्रासामुळं डिसले गुरुजी उद्विग्न झाले. डिसले गुरूजी म्हणाले, राज्यपाल येणार होते तेव्हा थेट राज्यपालांशी संपर्क साधला याचा राग मनात धरला होता. राज्यपालांशी थेट संपर्क झाल्यानंतर अधिकाऱ्यानी थेट तुझा वारे गुरूजी करू असा निरोप दिला होता.



त्यामुळे अशा वातावरणात या व्यवस्थेत राहणे शक्य नाही. झोपही शांत लागत नाही. घरी सगळ्यांळी चर्चा केली. त्यामुळे या व्यवस्थेतून बाहेर पडायचे ठरवले आहे. सतत होणाऱ्या आरोपामुळे व्यथित असून वारे सर होण्याअगोदर बाहेर पडणार आहे.

काय आरोप आहेत?

सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी रणजित डिसले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. डिसले गुरुजी गेल्या तीन वर्षांपासून आपल्या शाळेकडे फिरकलेच नाही, तीन वर्षांच्या काळात डिसले गुरुजींनी काय केलं? याबाबत चौकशी समितीचा अहवाल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झालाय. त्यामुळं डिसले गुरुजींवर कायदेशीररित्या कारवाई करण्यात येणार आहे असं शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी म्हटलंय.

याविषयावर संशोधन करण्यासाठी त्यांना सहा महिने अमेरिकेत जाऊन अभ्यास करायचे आहे. यासाठी दीड महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेकडे अध्यापन रजा मिळवण्यासाठी अर्ज केला होता. काल जेव्हा डिसले गुरुजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे भेटीला गेले होते तेव्हा सादर केलेल्या अर्जामध्ये त्रुटी असल्याचं सांगितले गेलं आणि इतरही गंभीर आरोप केले.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्व शाळा बंद आहेत. अशावेळी डिसले गुरुजी यांनी विविध प्रयोग करून विद्यार्थाना शिकविण्याचं काम केलं. शिक्षकांनी आपली गुणवत्ता कशी वाढवावी, ऑनलाईन शिक्षणाला पर्याय काय, परदेशात मुलांना कसं शिक्षण दिलं जातं याचा अभ्यास केला. परिणामी त्यांची वर्ल्ड बँकेच्या शिक्षण सल्लागारपदी नियुक्ती झाली. अनेक पुरस्कार मिळाले.

भाजपकडून निषेध

ग्लोबल टिचर पुरस्कार मिळवणारे बार्शी जी सोलापूर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रणजित डिसले गुरुजी यांनी PHD करण्यासाठी अमेरिका जायला रजा मागितली. पण शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी डिसले यांना रजा नाकारणे, त्यांच्या जाण्यावर आक्षेप घेणे निंदनीय आहे. देशाच्या शिक्षण क्षेत्राची मान उंचवणाऱ्या गुरुजीला असा अनुभव येणे चुकीचे असून अशा शिक्षणधिकाऱ्याचा निषेध आहे, असं भाजपचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला आहे.

SOLAPUR : Contempt after award! Disley Guruji’s grief! Guruji, who uplifted the dignity of the country’s education sector, was persecuted by education officials in the state!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात