Virat Kohli vs Dada : विराट कोहलीच्या वक्तव्यावर सौरव गांगुली म्हणाले – ‘नो कमेंट्स’…

  • दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर निघण्याआधी विराटने पत्रकार परिषदेत केलेल्या गौप्यस्फोटांमुळे नवा वाद.
  • दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर निघण्याआधी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने केलेल्या वक्तव्याची सध्या सर्वत्र चर्चा होते आहे. आपल्याला कर्णधारपदावरुन हटवण्यापासून ते बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने केलेल्या वक्तव्याला खोटं ठरवत विराटने या पत्रकार परिषदेत अनेक गौप्यस्फोट केले.
  • विराटच्या या पत्रकार परिषदेवर बीसीसीआयनेही भूमिका घेतली आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या मोठा गदारोळ माजला आहे. जेव्हापासून बीसीसीआयने विराट कोहलीला वनडेच्या कर्णधारपदापासून हटवलं आहे तेव्हापासून विविध वादांना तोंड फुटलं आहे.बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत विराटने वनडे आणि टी-20च्या कर्णधारपदावरून मोठी विधानं केली. यानंतर आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली आहे.Virat Kohli vs Dada: On Virat Kohli’s statement, Sourav Ganguly said – ‘No comments

BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने प्रसारमाध्यमांशी बोलताना विराट कोहलीच्या पत्रकार परिषदेवर व्यक्त होण्यासाठी नकार दिलाय.”मला आता याबद्दल काहीही बोलायचं नाहीये, आम्ही योग्य पद्धतीने या प्रकरणात लक्ष घालू, तुम्ही हे बीसीसीआयवर सोडा.”



काय म्हणाले होते सौरव गांगुली?

“मी स्वतः विराटशी बोललो होतो आणि त्याला टी-२० संघाची कॅप्टन्सी सोडू नकोस असं सांगितलं. परंतू वर्कलोडमुळे त्याने असा निर्णय घेतला. माझ्या मते यात काही चुकीचंही नाहीये. तो प्रदीर्घ काळापासून खेळत असून भारतासाठी एक महत्वाचा खेळाडू आहे. विराटच्या या निर्णयामुळेच निवड समितीने White Ball Cricket मध्ये एकच कर्णधार नेमण्याचं ठरवलंय. कारण प्रत्येक प्रकारासाठी नवा कर्णधार असं आम्हाला करायची नव्हतं.”

गांगुलीचे हेच वक्तव्य विराट कोहलीने पत्रकार परिषदेत खोटं पाडलं आहे. “टी-२० संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय मी सर्वात आधी BCCI ला सांगितला. त्यांनीही माझ्या या निर्णयाचं स्वागत केलं. माझ्या निर्णयाबद्दल कोणालाही प्रॉब्लेम नव्हता. मला कोणीही सांगितलं नाही की तू टी-२० ची कॅप्टन्सी सोडू नकोस,

याउलट त्यांनी माझ्या निर्णयाची स्तुती केली. मी त्यावेळी टेस्ट आणि वन-डे संघाची कॅप्टन्सी करु इच्छितो असंही सांगितलं होतं. परंतू निवड समितीला काही वेगळा निर्णय घ्यायचा असेल तर ते ही मला मान्य आहे”, असं म्हणत विराटने आपली बाजू स्पष्ट केली.3

Virat Kohli vs Dada: On Virat Kohli’s statement, Sourav Ganguly said – ‘No comments

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात