मुंबईला साथरोगांचा अक्षरशः विळखा, वर्षभरात रुग्णसंख्येत १८ टक्क्यांची वाढ


विशेष प्रतिनिधी

मुंबई – मुंबईत साथरोगांच्या रुग्णसंख्येत गतवर्षीच्या तुलनेने यंदा सुमारे १८ टक्के वाढ झाली आहे. मलेरिया, डेंगी, गॅस्ट्रो, कावीळ, तसेच स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान, चिकनगुनिया, कावीळ, स्वाईन फ्ल्यू आणि गॅस्ट्रोमुळे गेल्या दोन वर्षांत एक ही रुग्ण दगावल्याची नोंद नाही. Viral infection increasing very fastly in Mumbai

मुंबईत यंदा पावसाळा अधिक वेळ लांबल्याने पावसाळी आजारांमध्ये मोठी वाढ झाली. गेल्या वर्षीच्या म्हणजेच २०२० च्या तुलनेत या वर्षी मलेरियाचे १३३, डेंगी ७४४, गॅस्ट्रो ४७७, कावीळ ३८, चिकनगुनिया ७८, स्वाईन फ्ल्यू २० रुग्ण वाढले. दिलासादायक बाब म्हणजे लेप्टोच्या रुग्णसंख्येत घट झाली. २०२० मध्ये मलेरियाचे ५००७ रुग्ण होते, ती संख्या यंदा ५१४० झाली.डेंगीची रुग्णसंख्या १२९ वरून ७७३, गॅस्ट्रो २५४९ वरून ३०२६, कावीळ २६३ वरून ३०१, चिकनगुनिया शून्यावरून ७८ आणि स्वाईन फ्ल्यू ४४ वरून ६४ वर पोहोचले. दरम्यान, लेप्टोची रुग्णसंख्या काहीशी कमी झाली आहे. ती रुग्णसंख्या २४० वरून २२४ पर्यंत घसरली आहे.

साथरोगांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण यंदा कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण यंदा ५८ टक्क्यांनी कमी झाले. मलेरिया एकावरून शून्य, लेप्टो आठवरून चारपर्यंत खाली आले, तर डेंगीमुळे गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही तीन मृत्यू झाले.

Viral infection increasing very fastly in Mumbai

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण