नारायण राणे यांच्यावर नाशिक पोलिसांनी अटकेची कारवाई केली.हे प्रकरण चांगलच चर्चेत आल्यास.नारायण राणेंना अटक केल्यानंतर अनेक नेत्यांनी राणेंवर टीका केल्या.Vaibhav Naik said, Narayan Rane misunderstood what law is
विशेष प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर नाशिक पोलिसांनी अटकेची कारवाई केली.हे प्रकरण चांगलच चर्चेत आल्यास.नारायण राणेंना अटक केल्यानंतर अनेक नेत्यांनी राणेंवर टीका केल्या.
यादरम्यान शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी यावर प्रतिक्रिया देताना नारायण राणे यांना कायदा काय असतो हे कळून चुकलं असेल असं म्हणत टोला लगावलाय. तसेच नारायण राणे आणि त्यांच्या मुलांनी शिवसेनेची रस्त्यावरची ताकद काय आहे हे अनुभवलं असेल, असंही नमूद केलं.
मी केंद्रीय मंत्री आहे माझं कोणी काही करू शकत नाही अशा अविर्भावात राहणाऱ्या नारायण राणेंना कायदा काय असतो हे कळून चुकले आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. कायद्याच्या पुढे कोणीही नेता, मंत्री मोठा नाही हे ठाकरे सरकारने दाखवून दिले.
शिवसेनेची रस्त्यावरची ताकद नारायण राणे व त्यांच्या मुलांनी आज अनुभवली आहे. यापुढेही ठाकरे सरकारमध्ये कायद्याचे राज्य चालणार आहे. त्यामुळे उद्धवजी ठाकरे यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.
गेले कित्येक दिवस शिवसेनेवर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या, शिवसेनेवर विनाकारण टीका करणाऱ्या, शिवसैनिकांना आव्हान देणाऱ्या नारायण राणेंना आज शिवसैनिकांनी अद्दल घडविली आहे. शांत असलेली शिवसेना वेळप्रसंगी रौद्र रूप धारण करू शकते.यापुढच्या काळातही कोण अंगावर येत असेल तर शिंगावर घेण्याची ताकद संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये आहे. यापुढेही कोण अंगावर येत असेल तर जशास तसे उत्तर दिले जाणार आहे. असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App