वडगाव मावळ न्यायालयातील महिला न्यायाधीशास लाच घेतल्या प्रकरणी अटक, खटला मॅनेज करून देण्यासाठी 50 हजार रुपये

न्यायाधीशांनाच लाच घेतल्याप्रकरणात अटक होण्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ न्यायालयात घडला आहे.Vadagav court Woman Judge arrested in bribe case.


विशेष प्रतिनिधी 

वडगाव मावळ : न्यायाधीशांनाच लाच घेतल्याप्रकरणात अटक होण्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ न्यायालयात घडला आहे.फौजदारी खटला न्यायाधीशांना मॅनेज करून रद्द करण्यासाठी खाजगी महिलेच्या

माध्यमातून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारल्या या प्रकरणात लाचलुचपत विभागाने थेट वडगाव मावळ न्यायालयातील महिला न्यायाधीश अर्चना दीपक जतकर याांना गुरुवारी दुपारी अटक केली .याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात यापूर्वी निलंबित पोलिस निरीक्षक अनिल ऊर्फ भानुदास जाधव यांना अटक केली होती. लाच घेताना खाजगी महिला शुभावरी भालचंद्र गायकवाड (वय २९) यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ५० हजार रुपयांची लाच घेताना जानेवारी महिन्यात अटक केली होती.

त्यानंतर या गुन्ह्यात महिला न्यायाधीश यांचादेखील समावेश असल्याचे निष्पन्न झाल्याने गुरुवारी एसीबीने न्यायाधीश अर्चना जतकर यांना अटक केली आहे.

Vadagav court Woman Judge arrested in bribe case.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*