राज्याला अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा, वीज कोसळून दहाजण ठार ; जनावरे दगावली


विशेष प्रतिनिधी

सातारा : राज्यात रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. राज्यात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. साताऱ्यात मुसळधार पावसात खंडाळा आणि माण तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू झाला. तर दोन ठिकाणी वीज पडल्याने मंदिर आणि घराचे नुकसान झाले आहे.Unseasonal Rain lashes states , Ten Died Due To Thunderstorms

प्रतापगंजपेठेत घराच्या टेरेसवर वीज कोसळले. त्यामुळे भिंतीला भलेमोठे भगदाड पडले. तर कळंबे गावात शिखरावर वीज पडल्यामुळे मंदिराचे नुकसान झाले.



दरम्यान, रविवारी झालेल्या पावसामुळे राज्यात 7 जणांनी प्राण गमावले असून 5 जनावरेही दगावले आहेत. शेतीचेही नुकसान झाले.बीड जिल्ह्यात वीज कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.

अंबाजोगाईत आणि बीडच्या सानपवाडीतील पाच जनावरे ठार झाली.परभणी जिल्ह्यात वीज कोसळून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आहे. विठ्ठल आव्हाड (वय 12 वर्) आणि वैभव दुगणे (वय 11) अशी नावे आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथे सायंकाळी वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला.जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील नजीकपंगरी येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. राधाकिसन जिजा वाघ असं याचे नाव आहे.

Unseasonal Rain lashes states , Ten Died Due To Thunderstorms

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात