हिंदुत्व आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची संबंध तोडा या बंडखोरांच्या महत्त्वाच्या मुद्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या फेसबुक लाईव्ह मधून वाटाण्याच्या अक्षता लावल्या!! Uddhav Thackeray’s inability to share Hindutva, Congress-NCP ties
शिवसेना हिंदुत्ववादी आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे, असा दावा करीत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी मात्र संबंध तोडायला ठाम नकार दिला आहे. उलट काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने अजूनही आपल्यावर विश्वास दाखवल्याचे मुख्यमंत्र्यांनी बंडखोर शिवसेना आमदारांना सांगून एक प्रकारे डिवचले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर आता शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील 46 आमदारांचा गट असल्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून अडचणीत आलेल्या उद्धव ठाकरे यांनी फुल इमोशनल ड्रामा करत बुधवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या बंडखोरांना आवाहन केले आहे.
तुम्हाला जर मी मुख्यमंत्रीपदी नको असेन तर मला समोर येऊन सांगा, मी माझा राजीनामा द्यायला तयार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
…तर मी माझा राजीनामा देतो
काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून मला सांगण्यात आम्हाला मुख्यमंत्रीपदी आम्हाला उद्धव ठाकरे नको असे म्हटले असते तर मला काही वाटलं नसतं. पण शरद पवार आणि कमलनाथ यांनी फोन करुन ते माझ्यासोबत असल्याचे सांगितले. पण माझ्याच पक्षातल्या माझ्या माणसांना मी नको असेन तर मग काय करायचं? माझ्या लोकांना जर मी मुख्यमंत्रीपदी नको असेन तर त्यांनी ते सुरत आणि इतर ठिकाणी जाऊन बोलण्यापेक्षा मला समोर येऊन सांगायचं होतं. त्यांच्यापैकी एकाही आमदाराने मला सांगितलं की आम्हाला मुख्यमंत्रीपदी नको, तर मी आता माझा राजीनामा द्यायला तयार आहे. यावर जर कोणाचा विश्वास नसेल तर आज संध्याकाळपासून मी माझा मुक्काम वर्षावरुन मातोश्रीला हलवत आहे.
मला सत्तेची लालसा नाही, मला खुर्चीला चिकटून बसायचं नाही. मी शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे, त्यामुळे मला कुठलाही मोह खेचू शकत नाही. त्यामुळे आज मी माझं राजीनामा पत्र तयार करुन ठेवत आहे, ते तुमच्या हातात देतो ते तुम्ही राज्यपालांकडे घेऊन जा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App