शिवसेनेला खिंडार : “बाळासाहेब ठाकरे निष्ठ” शिवसेना गुवाहाटीत; “पवार निष्ठ” शिवसेना मुंबईत!! वाचा कोण कुणाला कसे समजवतेय??


“बाळासाहेब ठाकरे निष्ठ” शिवसेना गुवाहाटीत आणि “पवार निष्ठ” शिवसेना मुंबईत!! अशी आज बुधवारी दुपारी 3.00 वाजताची स्थिती आहे. गुवाहाटीतल्या “बाळासाहेब ठाकरे निष्ठ” शिवसैनिकांवर आणि आमदारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश शिवसेना विधिमंडळ पक्षनेते आधीच दिले आहेत. पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीची सूचना देणारे ई-मेल एकनाथ शिंदे यांच्या बरोबर असलेल्या आमदारांना केले आहेत आणि त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवर तसे पत्र पाठवले आहे. Balasaheb Thackeray loyal Shiv Sena in Guwahati Pawar loyal Shiv Sena in Mumbai

पण एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेले बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निष्ठा असलेले सर्व आमदार ठाम असल्याचे दिसत आहे. कारण शिवसेनेने पाठवलेल्या पत्रानुसार ते मुंबई सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत येणार नाहीत.

– पवार निष्ठ सचिन अहिर काढताहेत समजूत

एकीकडे गुवाहटीत बसलेल्या शिवसेना आमदारांवर अशी कारवाईची टांगती तलवार ठेवून दुसरीकडे मुंबईत उरलेल्या शिवसेना आमदारांची समजूत सचिन अहिर हे शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि आदित्य ठाकरे यांच्याबरोबर जाऊन काढत आहेत. सचिन अहिर मुंबईत उरलेल्या प्रत्येक शिवसेना आमदारांना भेटून पक्षाची भूमिका समजावून सांगत आहेत. एक प्रकारे उरलेल्या शिवसेना आमदारांना एकत्र ठेवण्याचा हा प्रकार आहे. पण उद्धव ठाकरे यांनी ही जबाबदारी दिले सचिन आहेर मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, हे विसरून चालणार नाही. ते काँग्रेस – राष्ट्रवादीच्या सरकार मध्ये राष्ट्रवादीकडून मंत्री होते. हा महत्त्वाचा मुद्दा येथे लक्षात घेतला पाहिजे.

म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गुवाहाटीमध्ये असलेले आमदार आपण बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान आहोत, त्यांचे हिंदुत्व आपण सत्तेसाठी सोडणार नाही, हिंदुत्वाशी सत्तेसाठी तडजोड करणार नाही असे सांगत आहेत तर दुसरीकडे एकेकाळचे शरद पवार निष्ठ नेते आणि आत्ताचे शिवसेनेचे आमदार सचिन आहिर मुंबईत उरलेल्या शिवसेनेचा आमदारांची समजूत काढत आहेत!!, हे आत्ता चे चित्र आहे.

– संजय राऊत यांचे बाईट

याखेरीज शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे मुंबईत दर तासाला पत्रकारांना भेटून वेगवेगळे बाईट देत आहेत. त्यामध्ये अर्थातच महाविकास आघाडी सरकार अस्थिर असल्याच्या बातम्या देत असण्याबरोबरच सत्ता गेली तरी चालेल शिवसेना परत उभी राहील, असे वक्तव्य करून शरद पवारांना अनुकूल भूमिका घेत आहेत.

– काँग्रेसकडून ठाकरे यांची पाठराखण

तिसरीकडे काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी देखील काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीत कायम असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पाठराखण करणार असल्याचा निर्वाळा दिला आहे.

या सगळ्याचा राजकीय अर्थ उघड आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी निष्ठा राखणारे हिंदुत्वाचा झेंडा उचलून धरणारे सगळे आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गुवाहाटीमध्ये एकवटले आहेत, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उरलेले शिवसेनेचे आमदार पवार निष्ठावानांकडून आपली समजून काढून घेत आहेत.

Balasaheb Thackeray loyal Shiv Sena in Guwahati Pawar loyal Shiv Sena in Mumbai

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात