उद्धव ठाकरे पडणार मातोश्री – मुंबईबाहेर; संजय राठोडांना शह देण्यासाठी पहिलाच दौरा पोहरादेवीचा!!


विशेष प्रतिनिधी 

यवतमाळ : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनेत उठाव होऊन आपले महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर प्रथमच मुंबई बाहेर पडणार आहेत. ते आपला पहिलाच दौरा एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात नव्हे, तर मराठवाड्यातील एका टोकाला म्हणजे वाशीमला काढणार आहेत. या आधी उद्धव ठाकरे फक्त खासदार अरविंद सावंत यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मातोश्री बाहेर पडले होते. Uddhav Thackeray will fall Matoshree – outside Mumbai

शिंदे गटासोबत जाऊन मंत्री झालेले संजय राठोड यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच शह देण्याच्या उद्देशाने उद्धव ठाकरे हे बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी (ता. मानोरा, जि. वाशीम) दौरा करणार आहेत. राठोड यांनी शिवसेनेची साथ सोडल्यानंतर बंजारा समाजाची ताकद पुन्हा शिवसेनेच्या पाठीशी उभी करण्याचा ठाकरे यांचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला महत्व आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.


Uddhav Thackeray : भाजपवर हल्लाबोल करताना मुख्यमंत्र्यांच्या तोंडी काँग्रेसचीच भाषा!!


राज्यात २०१४ ते १९ या काळात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना युतीत तणाव निर्माण झाला होता. अशा वातावरणात संजय राठोड यांनी पोहरादेवी (ता. मानोरा) येथे नगारा वस्तुसंग्रहालयाच्या भूमिपूजनासाठी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना ३ डिसेंबर २०१८ रोजी एका मंचावर आणले होते. त्यावेळी कार्यक्रमाला उपस्थित लाखोंच्या संख्येतील बंजारा समाज पाहून या दोन्ही नेत्यांना बंजारा समाजाच्या ताकदीचा प्रत्यय आला. त्यानंतर पुन्हा भाजप-युती झाली. पण निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकारणाला कलाटणी मिळाली.

महाविकास आघाडी सरकारमध्ये आमदार संजय राठोड वनमंत्री झाले. दरम्यानच्या काळात एका युवतीच्या आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर राठोड यांनी पोहरादेवी येथे भेट देऊन राजकीय शक्तिप्रदर्शन केले होते. गर्दी जमवल्याने शिवसेनेवर चौफेर टीका झाली होती. दरम्यान राठोड यांना पुन्हा मंत्री करावे, यासाठी पोहरादेवीतील महंत, बंजारा समाजातील विविध संस्था, संघटनांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र भाजपने या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतल्याने राठोड पुन्हा मंत्री होऊ शकले नाहीत दरम्यान राज्यात घडलेल्या ताज्या राजकीय घडामोडीत संजय राठोड दोन दिवस उद्धव ठाकरेंसोबत राहून नंतर शिंदे गटात सहभागी झाले. तेव्हा ‘संजय राठोड यांच्या अडचणीच्या काळात आपण त्यांना मदत केली याची खंत वाटते’, अशी जाहीर टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली होती.

उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवी येथे भेट द्यावी, यासाठी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक, मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील राजू नाईक यांनी पुढाकार घेतला आहे. राजू नाईक यांनी पोहरादेवी येथे भेट देऊन धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे करून देत पोहरादेवी भेटीचे निमंत्रण दिले. उद्धव ठाकरे हे लवकरच पोहरादेवी येथे भेट देऊन विदर्भात शिवसेना प्रचाराची सुरुवात करणार असल्याचे यावेळी राजू नाईक यांनी स्पष्ट केले. या भेटीवरून बंजारा समाजात दोन गट पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

याचा अर्थ उद्धव ठाकरे हे प्रथमच शिंदे गटावर मुंबई बाहेर जाऊन हल्लाबोल करणार आहेत. त्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याची निवड करण्याऐवजी संजय राठोड यांच्या बालेकिल्ल्याची केली आहे.

Uddhav Thackeray will fall Matoshree – outside Mumbai

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती