“याला” म्हणतात, “इज ऑफ डूइंग बिजनेस”!!; सुनील कुमार मित्तल यांनी शेअर केली स्टोरी!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : एका कंपनीला सरकारने ठरल्याप्रमाणे स्पेक्ट्रम फ्रिक्वेन्सी बँड दिले. त्याबरोबर “ई बँड” पण दिले… योग्य पैसे दिले योग्य काम झाले…, ही स्टोरी शेअर केली आहे, प्रख्यात उद्योगपती सुनील कुमार मित्तल यांनी!! Story shared by Sunil Kumar Mittal

केंद्र सरकारने 5g स्पेक्ट्रमच्या लिलावात नुकतेच 5g स्पेक्ट्रमचे एलोकेशन एअरटेल कंपनीला झाले आहे. त्याचे 8312.4 कोटी रुपये कंपनीने ताबडतोब अदा केले. कंपनीला सरकारने ताबडतोब स्पेक्ट्रमचे फ्रिक्वेन्सी बँड एलोकेशन तर केलेच, पण त्याच वेळी आधीच जाहीर केलेले “ई बँड” पण देऊन टाकले. याची स्टोरी सुनील कुमार मित्तल यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून शेअर केली आहे.


टेलीकॉम क्षेत्रासमोर एकच कंपनी प्रश्न निर्माण करतेय, एअरटेलचे सुनील मित्तल यांचा रिलायन्सवर नाव न घेता निशाणा


या स्टोरीत सुनील कुमार मित्तल म्हणतात, “याला” म्हणतात इज ऑफ डूइंग बिजनेस!! एअरटेल कंपनीने पैसे भरले. सरकारने ताबडतोब आश्वासनांची पूर्ती केली. कुठेही धावपळ नाही. सरकारी कार्यालयातून गोंधळ गडबड नाही. हेलपाटे मारणे नाही. फायली अडवून ठेवणे नाही. योग्य पैसे भरले, योग्य काम झाले!!

गेल्या 30 वर्षात मी टेलिकॉम सेक्टर मध्ये काम करतो आहे. डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनचा मला प्रदीर्घ अनुभव आहे. पण आजच्यासारखे काम झाल्याचा मला यापूर्वी केव्हाही अनुभव आला नाही. आता मात्र वेगाने काम होत आहे. नेतृत्वापासून अगदी तळातल्या कर्मचाऱ्यापर्यंत वेगात काम. कुठेही अडथळा नाही. हा केवढा मोठा बदल आहे. देशाच्या महासत्तेच्या वाटचालीसाठी हा बदल फार उपयुक्त ठरतो आहे.

Story shared by Sunil Kumar Mittal

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात