फेसबुक वरील औरंगजेब विषयीच्या पोस्टवरून उस्मानाबाद येथे दोन गटात दगडफेक, चार पोलीस जखमी

विशेष प्रतिनिधी

उस्मानाबाद : सध्याच्या डिजीटल जमान्यामध्ये फेसबूक पोस्ट आणि ट्विटर पोस्ट वरून बरेच मोठे राडे झालेले आहेत. अशाच प्रकारची आणखी एक घटना उस्मानाबाद येथे झाली आहे. सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या औरंगजेबा विषयाच्या पोस्टवरून उस्मानाबादमधील दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. मंगळवारी 19 ऑक्टोबर रोजी रात्री 10 च्या सुमारास शहरातील विजय चौक येथे ही घटना घडली आहे. या दगडफेकीमध्ये पोलिस बंदोबस्तासाठी आलेले चार पोलीस देखील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ तातडीने घटनास्थळी पोहोचले होते.

Two groups pelted stones at Osmanabad because of facebook post about Aurangzeb on Facebook, injured 4 policemen

औरंगजेबाच्या पोस्ट वर दोन तरूणांनी फेसबुकवर आपली प्रतिक्रिया दिली. दुसऱ्या गटाने या प्रतिक्रियेमुळे आमच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोप केला आहे. या फेसबुक प्रतिक्रियेवरून तक्रार आल्यानंतर पोलिसांनी कार्यवाही करण्यापूर्वीच दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक सुरू केली आणि कायदा हातात घेतला.


गाढविणीचे दूध चक्क १० हजार रुपये लीटर, उस्मानाबाद जिल्ह्यात भोंगा लावून विक्री


या घटनेनंतर परिसरात काही काळ वातावरण अतिशय गंभीर होते. तर विजय चौक परिसरातील दोन्ही गटातील नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पाेलिसांनी यावेळी केले आहे. त्याचप्रमाणे ज्या नागरिकांना या घटनेविषयी काही माहिती असेल, त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे. आम्हाला गुप्तपणे माहिती दिली तरी चालेल. सर्व प्रकारच्या मदतीचे आम्ही स्वागत करू. असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी केले आहे.

Two groups pelted stones at Osmanabad because of facebook post about Aurangzeb on Facebook, injured 4 policemen

 

महत्त्वाच्या बातम्या