पुरग्रस्तांना अधिक नुकसान भरपाई देण्यासाठी संघर्ष देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारला इशारा


विशेष प्रतिनिधी

सांगली : यंदाच्या पुरात २०१९ पेक्षा नुकसान अधिक झाल्याने अधिक नुकसान भरपाई मिळावी,यासाठी सरकारवर दबाव आणू. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी संघर्ष करू,अशी भूमिका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली.To Give more compensation to flood victims We Will struggle: Devendra Fadnavis

भिलवडी येथील पाहणी प्रसंगी पूरग्रस्तांची संवाद साधताना फडणवीस यांनी राज्य सरकारला हा इशारा दिला आहे.देवेंद्र फडणवीस म्हणाले, २०१९ च्या प्रमाणेच हा महापूर आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात खूप मोठं नुकसान झाले आहे.सर्व सामान्य माणसापासून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान पाहायला मिळत आहे. २०१९ मध्ये आपल्या सरकारच्या माध्यमातून एनडीआरएफच्या निकषा पलीकडे सर्व पातळ्यांवर पूरग्रस्तांना, शेतकऱ्यांना मदत केली होती. या वेळीही अधिक नुकसान आहे,

त्या पार्श्वभूमीवर अधिक नुकसान भरपाई मिळायला हवी. त्या दृष्टीने मदत मिळण्यासाठी राज्य सरकारवर दबाव असेल आणि पूरग्रस्तांना मदत मिळेपर्यंत आमचा संघर्ष करू,असा इशाराही देवेंद्र फडणीस यांनी दिला.

  •  पुरग्रस्तांना जादा नुकसान भरपाई देण्यासाठी संघर्ष
  • सांगली जिल्ह्यात २०१९ पेक्षा गंभीर संकट
  •  सामान्य माणसापासून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान
  •  मदत मिळवून देण्यासाठी राज्य सरकारवर दबाव
  • भिलवडी येथील पाहणी प्रसंगी पूरग्रस्तांची संवाद
  • पूरग्रस्तांना मदत मिळेपर्यंत संघर्ष करणार

To Give more compensation to flood victims We Will struggle: Devendra Fadnavis

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण