मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चाळिसा म्हणणार म्हणून खासदार नवनीत राणा आणि त्यांचेपती आमदार रवी राणा यांना महाविकास आघाडीने सुडाच्या राजकारणात अटक केली. मात्र, याचा मनस्ताप राज्यातील तीन आयपीएस अधिकाऱ्यांना होणार आहे. त्यांना संसदेच्या हक्कभंग समितीसमोर साक्ष देण्यासाठी हजर व्हावे लागणार आहे.Three IPS officers will have to appear before the committee in the Navneet Rana case
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चाळिसा म्हणणार म्हणून खासदार नवनीत राणा आणि त्यांचेपती आमदार रवी राणा यांना महाविकास आघाडीने सुडाच्या राजकारणात अटक केली. मात्र, याचा मनस्ताप राज्यातील तीन आयपीएस अधिकाऱ्यांना होणार आहे. त्यांना संसदेच्या हक्कभंग समितीसमोर साक्ष देण्यासाठी हजर व्हावे लागणार आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी दाखल केलेल्या हक्कभंगाच्या नोटीसची दखल घेऊन लोकसभेच्या हक्कभंग समितीने राज्यातील तीन आयपीएस अधिकाºयांन येत्या ६ एप्रिलला तोंडी साक्षी पुराव्यासाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.’
काही दिवसांपूर्वी अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यावरून झालेल्या वादानंतर खासदार नवनीत राणा यांना संसदीय कर्तव्ये पार पाडण्यात पोलीस अधिकाऱ्यांनी अडथळे आणल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे. लोकसभेच्या हक्कभंग समितीचे अध्यक्ष सुनील कुमार सिंग यांच्या १५ सदस्यीय समितीने राज्यातील तीन आयपीएस अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
यात मुंबईचे पोलीस आयुक्त, अमरावतीचे पोलीस आयुक्त व अमरावतीच्या पोलीस उपायुक्तांचा समावेश आहे. या तिन्ही अधिकाऱ्यांना येत्या ६ एप्रिलला संसदेतील हक्कभंग समितीच्या कक्षात तोंडी साक्षी पुराव्यासाठी हजर राहावे लागणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App