वृत्तसंस्था
मुंबई : राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या बहुमतावर सोमवारी (4 जुलै) शिक्कामोर्तब झाले. नव्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 164 तर विरोधात फक्त 99 मते पडली. समाजवादी व एमआयएमच्या 3 आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली. विश्वासदर्शक ठरावाला सर्वपक्षीय 18 आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. त्यात काँग्रेसच्या 10 सदस्यांचा समावेश आहे.Three important announcements of Shinde Fadnavis government, PM Modi’s appeal rejected by Thackeray will be followed
सुधीर मुनगंटीवार व भरत गोगावले यांनी नियम 23 अन्वये सकाळी 11 वाजता विश्वासदर्शक ठराव मांडला. त्यावर शिरगणतीने मतदान घेण्यात आले. विश्वासदर्शक ठराव जिंकताच सत्ताधारी बाकांवरून शिवसेना-भाजप युतीच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. जय श्रीराम व भारत माता की जय अशा घोषणांनी सभागृह दुमदुमून गेले. यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारला विश्वासदर्शक ठरावाला १७० सदस्यांचा पाठिंबा होता.
त्यात अपक्ष व छोट्या पक्षांचा बहुतांश भरणा होता. आज हे आमदार नव्या सरकारच्या बाजूला उभे राहिल्याचे दिसून आले. ‘राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत. युतीचे सरकार अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनाची सांगता झाल्यावर दिली.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली. सभागृहात विरोधी बाकांवर सर्वाधिक शिवसेना आमदार आहेत. मात्र, त्यांच्यात दोन गट पडल्याने 53 आमदार असलेल्या राष्ट्रवादीला विरोधी पक्षनेतेपद मिळाले.
1. इंधनावरील व्हॅट कमी करणार
जागतिक बाजारपेठेत इंधनाच्या किमती वाढल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर कमी केला होता. राज्यांनाही कर कमी करण्याच्या सूचना केल्या होत्या. ठाकरे सरकारने यावर निर्णय घेतला नव्हता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सभागृहातच लवकरच सरकार इंधनावरील व्हॅट कमी करेल, असे सांगितले.
2. राज्य शेतकरी आत्महत्या मुक्तीचा संकल्प
राज्यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे शेतकरी. शेतकऱ्यांची अनेक जण विचारपूस करतात. मात्र, त्यांचे स्वप्न पूर्ण होत नाही. हे सरकार शेतकरी, सर्वसामान्यांचे आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाचे, समृद्धीचे दिवस यावेत यासाठी सरकार लवकरच योजना आणेल. आम्ही राज्य शेतकरी आत्महत्यामुक्त करू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
3. हिरकणी गावासाठी 21 कोटींचा निधी
हिरकणी या गावाच्या विकासाबाबत मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित केला होता. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, रायगड जिल्हा हा आमच्यासाठी अस्मिता आहे. ज्या हिरकणीने इतिहास घडवला, ते गाव वाचवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून २१ कोटींचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे शिंदे यांनी या वेळी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App