प्रतिनिधी
मुंबई – पवारांच्या घराण्यातील तिसरी पिढी भ्रष्टाचाराच्या घेऱ्यात आली आहे. ईडीने जरंडेश्वर कारखान्याच्या खरेदी गैरव्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नातेवाईकाच्या मालमत्तेवर टांच आणल्यानंतर आता आमदार रोहित पवार यांचे प्रकरण बाहेर आले आहे. Third genaration of Pawars is in the dock of corruption; kirit somaya and shalinitai patil targets rohit pawar
रोहित पवार यांनी कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदी करण्याच्या व्यवहारामध्ये घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईत केला. ज्येष्ठ नेत्या शालिनीताई पाटील यांनी देखील रोहित पवारांवरील आरोपांना दुजोरा दिला आहे. कन्नड साखर कारखान्याच्या विक्रीदरम्यान किंमत कमी करत रोहित पवारांनी घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. राज्य सहकारी बँकेत पवार कुटुंबाने घोटाळा केल्याचाही आरोप सोमय्या यांनी केला. शिखर बँकेत घोटाळा करून पवार कुटुंबाने अनेक कारखाने लाटल्याचा घणाघातही सोमय्या यांनी केला.
रोहित पवार यांनी कन्नड सहकारी साखर कारखाना ज्या पद्धतीने राज्य सरकारी बँकेच्या लिलावामध्ये मॅन्युप्युलेशन करुन गडबड करुन ५० कोटी रुपयांना विकत घेतला. बारामती अॅग्रो साखर कारखाना त्यांनी विकत घेतला. याचा देखील तपास व्हायला हवा. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा यामध्ये मोठा तोटा झाला आहे. हा व्यवहार म्हणजे पवार कुटुंबाचा मोठा घोटाळा आहे असा आरोप सोमय्या यांनी केलाय. त्यामुळे या व्यवहारांची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी सोमय्या यांनी केली.
ज्येष्ठ नेत्या शालिनीताई पाटील यांनी सोमय्या यांचे नाव न घेता रोहित पवारांवरील आरोपांना दुजोरा दिला. कन्नड कारखान्याबाबत तर कारखाना बारामती ऍग्रोने ५० कोटी रूपयांना विकत घेतल्यानंतर शिखर बँकेने त्याला १४० कोटी रूपयांचे कर्ज मंजूर केले, असा आरोप देखील शालिनीताई पाटील यांनी केला. त्यामुळे अजित पवारांपाठोपाठ पवार घराण्यातील तिसऱ्या पिढीवर भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या घेऱ्यात आली आहे
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App