एनसीबीचा पंच किरण गोसावीविरुद्ध फसवणुकीचा तिसरा गुन्हा पुण्यात दाखल


क्रूझवरील आर्यन खान पार्टी प्रकरणात एनसीबीचा पंच असलेल्या किरणं गोसावी विरोधात गुन्हे दाखल करण्याची मालिका सुरूच असून पुण्यात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Third case of fraud filed against NCB’s witness Kiran Gosavi in ​​Pune


विशेष प्रतिनिधी

पुणे : क्रूझवरील आर्यन खान पार्टी प्रकरणात एनसीबीचा पंच असलेल्या किरणं गोसावी विरोधात गुन्हे दाखल करण्याची मालिका सुरूच असून पुण्यात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील तरुणाची परदेशात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या किरण गोसावीवर तिसरा गुन्हा दाखल झाला असून, पैसे परत मागण्यास गेलेल्या तरुणाला पिस्तूलाचा धाक दाखवून धमकावल्याचे फिर्यादीमध्ये नमूद मारण्यात आले आहे.

किरण प्रकाश गोसावी, कुसुम गायकवाड आणि किरण गोसावीचा सहकारी अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


किरण गोसावी अखेर पुण्यात सापडला


याप्रकरणी प्रकाश माणिकराव वाघमारे (वय ४८, रा. महंमदवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. वाघमारे हे महंमदवाडी परिसरात राहतात. 13 नोव्हेंबर 2018 ते 28 नोव्हेंबर 2021 या कालावधीत पुणे- सोलापूर रस्त्यावरील क्रोम मॉल चौक परिसरात व लष्कर येथील एका ऑफिसवर तक्रारदार आणि त्यांच्या दोन मित्रांना मलेशियात आणि इतर देशात नोकरी लावण्याचे आमिष दाखविण्यात आले. ५५ हजार रुपये पगार मिळेल अशी बतावणी करण्यात आली होती.

व्हिसा, हॉटेल बुकिंग आणि इतर सुविधा देतो असे सांगत त्यांच्याकडून प्रथम ५५ हजार रुपये उकळण्यात आले. त्यानंतर ९० हजार असे एकूण १ लाख ४५ हजार रुपये घेण्यात आले. मात्र, त्यांना नोकरी लावण्यात आली नाही. वाघमारे यांनी परदेशात जाण्याची व्यवस्था करावी किंवा पैसे परत द्यावे अशी मागणी त्याच्याकडे केली. त्यावेळी ऑफिसनध्ये आरोपींनी पिस्तूलाचा धाक दाखवून त्यांना धमकी दिली.

Third case of fraud filed against NCB’s witness Kiran Gosavi in ​​Pune

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात