मुस्लिम बहुल भागात लसीकरणाबाबत जनजागृती व्हावी यासाठी राज्य सरकार अभिनेता सलमान खान याची मदत घेणार आहे.The state government will enlist the help of actor Salman Khan to increase vaccination
विशेष प्रतिनिधी
मुंबई : करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हा एक पर्याय असल्याचं सांगितलं जात असून याच पार्श्वभूमीवर राज्याने काही दिवसांपूर्वी १० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे.मात्र, राज्यात अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे लोक विविध गैरसमजांमुळे कोरोनाची लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत.
विशेषत: मुस्लिम बहुल भागात लोक लसीकरणाकडे पाठ फिरवत आहेत. बॉलिवूड अभिनेता सलमान खानबाबत राज्य सरकारने नवी योजना आखली आहे.आता सरकार सलमानच्या मदतीने मुस्लिमबहुल भागात लसीकरणाबाबत जनजागृती करणार आहे.
‘राज्यातील अनेक भागात लसीकरणाचा वेग व टक्का वाढवण्यासाठी, विशेष करून मुस्लिम बहुल भागात लसीकरणाबाबत जनजागृती व्हावी यासाठी राज्य सरकार अभिनेता सलमान खान याची मदत घेणार आहे,’ अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
ते म्हणाले, ‘विशेषतः सलमान खानचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे मुस्लिम समाजाच्या अधिक लोकसंख्या असलेल्या भागात लसीकरण वाढण्यास मदत होईल, असा विश्वास सरकारला आहे. याशिवाय सलमानसारखा मोठा चाहता वर्ग असलेल्या अभिनेत्यांसाठी लसीकरणाबाबतचे व्हिडिओही बनवले जातील, असे राजेश टोपे यांनी सांगितले.
यावर प्रतिक्रिया देताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “प्रत्येक वेळी लसीकरण होते तेव्हा मुस्लिमांमध्ये संशय निर्माण होतो. परिणामी मुस्लिमबहुल भागात लसीकरणाचे प्रमाण कमी असते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App