विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: विठ्ठलच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री गाडी चालवत गेले. राज्याला ड्रायव्हर नकोय. जनतेचं हित जपणारा चांगला मुख्यमंत्री राज्याला हवा आहे. गाडी चालवणारे हजारो ड्रायव्हर महाराष्ट्र शासनाकडे आहेत. त्यात काय कौतुक गाडी चालवण्याचं? अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे.The state does not want a driver, it wants a good Chief Minister who protects the interest of the people, criticizes Narayan Rane
कोकणात रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्याबाबत राज्य सरकारला कुठलेही गांभीर्य नसल्याचा आरोप करत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे म्हणाले, उध्दव ठाकरे गाडी चालवत मंत्रालयात आणि मंत्रिमंडळ बैठकीलाही जात नाहीत.
यात काय भूषण आहे? काय कर्तृत्व आहे. जनतेचा जीव धोक्यात असताना त्यांना वाचवायचं दिलं सोडून आणि ज्यांच्या घरातील माणसं गेली त्यांचं सांत्वन करायचं दिलं सोडून हे गाडी चालवत निघाले.राज्य सरकारला कुठलंही गांभीर्य नाही. पाऊस सुरू झाला आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तयारी करायला हवी आहे.
आषाढी एकादशीला पंढपूरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वत: गाडी चालवत गेले. पण त्यांना माणुसकी तरी आहे का? चेंबूर आणि भांडुपमध्ये अतिवृष्टीने घरं कोसळल्याने काही नागरिकांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांचं साधं सांत्वन करायला ते गेले नाहीत. भेटही दिली नाही, अशी टीका राणेंनी केली आहे.
नागरिकांना तातडीने हेलिकॉप्टर आणि बोटींनी बाहेर काढून त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था केली जायला हवी. मदत आणि बचावकायार्साठी केंद्र सरकारची टीम पाठवण्यात येईल. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांशी यासंदर्भात माझे बोलणे झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App