कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या नावाखाली सुरू तमाशा बंद व्हायला हवा, कॉँग्रेसच्या नेत्याचाच आघाडी सरकारवर निशाणा


मागील लॉकडाउनमुळे लोक एवढे उध्वस्त झालेली आहेत की, आजपर्यंत स्थिरावली नाहीत. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या नावाखाली जो तमाशा सुरू आहे तो बंद व्हायला हवा. लॉकडाउनची कुठलीही आवश्यकता नाही अशा शब्दांत कॉँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.The spectacle that started under the name of Corona’s second wave should be stopped, Congress leader is targeting the government.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मागील लॉकडाउनमुळे लोक एवढे उद्धवस्त झालेली आहेत की, आजपर्यंत स्थिरावली नाहीत. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या नावाखाली जो तमाशा सुरू आहे तो बंद व्हायला हवा. लॉकडाउनची कुठलीही आवश्यकता नाही अशा शब्दांत कॉँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्यात करोनाचा संसर्ग वाढत असल्याने, राज्य सरकार आता निर्बंध अधिकच कडक करत आहे. याशिवाय, पुन्हा एकदा लॉकडाउनचा निर्णय घेतला जाण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील ओशिवरा पोलीस स्टेशनजवळ स्थानिक हॉटेल व्यावसायिकांनी लॉकडाउन आणि सरकारी निबंर्धांविरोधात निदर्शनं केली. या हॉटेल व्यावसायिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी काँग्रेस नेते संजय निरूपम उपस्थित होते.



संजय निरूपम म्हणाले, मुद्दा केवळ एवढाच आहे की करोनाशी आपल्याला लढायचं आहे आणि हे कुणीच नाकारत नाही, परंतु लढण्यासाठी जगणं म्हत्वाचं आहे. ज्या प्रकारे विविध निर्बंध आणून लोकांचा धंदा बंद केला जात आहे, त्यामुळे बेरोजगारी पुन्हा एकदा वाढेल.

व्यवसाय बंद पडतील व संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडून जाईल. लोकांसमोर भूकबळीचे संकट निर्माण होईल. मागील लॉकडाउनमुळे लोकं एवढी उद्धवस्त झालेली आहेत की, आजपर्यंत स्थिरावली नाहीत. आता कोरोनाच्या दुसºयालाटेच्या नावाखाली जो तमाशा सुरू आहे तो बंद व्हायला हवा.

लॉकडाउनची कुठलीही आवश्यकता नाही. काही सावधानता बाळगण्यासाठी हॉटेलवाले देखील तयार आहेत, मुंबईचे सर्वसामान्य नागरीक देखील तयार आहेत. त्या दक्षतेची व्याख्या करा, त्या समजवा हॉटेल, रेस्टॉरंट व उर्वरीत व्यवसाय कसे चालतील? याची काळजी सरकारने करायला हवी.

कारण, मागच्यावेळी जो लॉकडाउन झाला तर मोठ्या प्रमाणात मुंबईहून स्थलांतरित मजुरांना मिळेल त्या मागार्ने व साधनाचा वापर करून जावं लागलं. तर आता जर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाली तर लोकांना बेराजगार होऊन गावी जावं लागू शकतं. ही परिस्थिती मुंबईसाठी व मुंबईच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगली ठरणार नाही.

काँग्रेसच्यवतीने मी मागणी करतो की, सरकारने आमचं म्हणणं ऐकावं सर्वसामान्य नागिरक, उद्योजकांच्या अडचणी त्यांनी ऐकाव्यात आणि जेवढं लवकर होईल तेवढं लॉकडाउनची धमकी देण्याऐवजी काही दक्षता बाळगण्यासाठी नव्या मार्गदर्शक सूचनांबरोबर सर्वांना सोबत आयुष्य जगण्याची संधी द्यावी, असेही निरपमम यांनी म्हटले आहे.

मला नाही माहिती की करोनाचा जो विषाणू आहे तो रात्री जास्त वेगाने कार्यरत असतो, की दिवसा? असा टोला मारताना निरुपम म्हणाले, रात्री ८ ते ११ हॉटेल बंद असणं म्हणजे हॉटेलचा धंदा संपूर्णपणे नष्ट करणे. बिअर बार, पब इत्यादी ज्या काही बाबी असतील त्या तुम्ही बंद करा,

पण सामान्य जी काही हॉटेल्स आहेत त्यांचा व्यवसाय ८ ते ११ या वेळेतच होत असतो तीच त्यांची धंद्याची वेळ असते. त्याला देखील तुम्ही नाईट कर्फ्यूच्या नावाखाली बंद करत आहात, हा उघडपणे अन्याय आहे.

The spectacle that started under the name of Corona’s second wave should be stopped, Congress leader is targeting the government.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात