Navneet Rana : राणा दांपत्य दिल्लीला जायच्या तयारीत; ठाकरे सरकार जामीन रद्द करण्याच्या तयारीत!!

वृत्तसंस्था

मुंबई : एकीकडे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दांपत्य आज राजधानी नवी दिल्लीला जाऊन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यांचे दिल्ली प्रवासाचे नियोजन चालले आहे, तर दुसरीकडे नवनीत राणा यांनी प्रसारमाध्यमांना बाईट देऊन जामीनासाठीच्या अटी शर्तींची उल्लंघन केले म्हणून जामीन रद्द करण्याची मागणी करण्याचा अर्ज ठाकरे – पवार सरकार कोर्टात दाखल करणार आहे. The Rana couple is preparing to leave for Delhiराणा दाम्पत्याला कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचे सर्व प्रयत्न ठाकरे – पवार सरकार करत आहे. त्यांच्या खार येथील निवासस्थानाच्या आज पुन्हा एकदा पालिकेचे मुंबई महापालिकेचे अधिकारी पाहणी करणार असून घरात आढळणाऱ्या बेकायदा बांधकामावर हातोडा चालवण्याचे नियोजन करत आहेत. राणा दांपत्य दुपारी 2.00 वाजता मुंबईतून निघून सायंकाळी दिल्लीत पोहोचण्याचे नियोजन करत आहे.

राणा दाम्पत्याला ते दिल्लीत पोहोचण्यापूर्वीच मुंबई पोलिस आडवतात की ठाकरे – पवार सरकारच्या अर्जाची दखल घेऊन कोर्ट त्यांचा जामीन लगेच रद्द करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

The Rana couple is preparing to leave for Delhi

महत्वाच्या बातम्या