ईडीपेक्षा शेतकऱ्याच्या खिशातल्या बिडीची किंमत जास्त; धनजंय मुंडेंचे वक्तव्य… पण अनिल देशमुख – नवाब मलिकांना हे मान्य…??


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात भल्याभल्यांच्या मागे इन्कम टॅक्स, ईडी लावलीय. पण त्या ईडीपेक्षा आमच्या शेतकऱ्याच्या खिशातल्या बिडीची किंमत जास्त आहे, अशा राणा भीमदेवी थाटातील भाषेत राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रातल्या भाजपा सरकारचे वाभाडे काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या या वक्तव्यानंतर बिडी पेक्षा ईडीची किंमत कमी आहे, हे वक्तव्य राष्ट्रवादीचे मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मान्य आहे का…??, अशी चर्चा सोशल मीडियात सुरू झाली आहे.The price of a bidi in a farmer’s pocket is higher than that of an ED


गोवा दौऱ्याच्या पूर्वसूचना देऊनही राज्यपाल कोशियारी पवार, शेतकरी मोर्चेकऱ्यांच्या राजकीय टार्गेटवर


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हजेरीत उस्मानाबादच्या मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी ईडी आणि बिडीवर भाष्य केले होते. धनंजय मुंडे म्हणाले होते, खऱ्या लोकशाहीचे दर्शन कुणी घडवून दाखवले असेल तर पवार साहेबांनी जगाला दाखवले. 64 आमदारांचे मुख्यमंत्री झाले. 54 आमदारांचे उपमुख्यमंत्री झाले. 44 आलेले मंत्री झाले आणि 105 वाले विरोधी पक्षात बसले आहेत. नगरपंचायत निवडणुकीत सर्वाधिक नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झाले आहेत. मात्र, भाजपच्या अंगातला माज अजूनही गेलेला नाही, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

भाजपच्या अंगातला माज अजूनही गेलेला नाही, होत्याच नव्हतं नव्हत्याचं केलं तरी भल्या भल्यांच्या मागे इन्कम टॅक्स काय ईडी काय सुरू आहे. ईडीची तर इज्जत ठेवली नाही. अरे त्या ईडी पेक्षा शेतकऱ्यांच्या खिशातल्या गणेश बिडीची किंमत जास्त आहे. त्यांना वाटतंय की आम्ही यांना झुकवू शकतो. भाजपची खरी जिरवायची असेल तर जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष दाखवून द्या. पुन्हा म्हणून भाजप कधीही महाराष्ट्राच्या मातीत अशा प्रकारचा नाद करणार नाही, असा विश्वास असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले.

धनंजय मुंडे यांच्या ईडी आणि बिडी वक्तव्यानंतर नंतर मात्र अनिल देशमुख आणि नवाब मालिक यांना हे मान्य आहेत का…?? कारण मुंडे बाहेर आहेत, पण हे दोघेही ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांना डीडीच्या कोठडी ची किंमत किंमत कळली आहे का…??, ती बिडीपेक्षा जास्त आहे का…??, असे खोचक सवाल अनेकांनी सोशल मीडियातून केली आहे.

The price of a bidi in a farmer’s pocket is higher than that of an ED

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात