गणेशोत्सव काळातही पोलिसांना मिळणार साप्ताहिक सुट्ट्या!!


प्रतिनिधी

मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात इतरांप्रमाणे पोलिसांनाही सणाचा आनंद लुटता यावा, याकरता त्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द करु नयेत, अशी सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केली. जिल्ह्यातील पोलीस अधिका-यांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. The police will also be available during Ganeshotsav WEEKLY VACATIONS!!

जिल्हा पोलीस अधीक्षक बलकवडे म्हणाले, गणेशोत्सव काळात प्रभारी अधिका-यांनी आपल्या हद्दीतील मंडळांच्या बैठका घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्याविषयी मार्गदर्शन व प्रबोधन करावे. विशेषत: ध्वनिप्रदूषणाबाबतचे प्रबोधन करावे. प्रत्येक मंडळाजवळ एक पोलीस कर्मचारी नियुक्त करावा. सणाच्या काळात पोलीस कर्मचा-यांना सणाचा आनंद लुटता यावा. याकरता त्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द करु नयेत.

28 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरदरम्यान अर्जित सुट्ट्या देऊ नयेत. यात वैद्यकीय कारणास्तव अधिकारी व कर्मचा-यांना काही अडचण असेल त्यांना त्या दिवशी रजा घेता येईल. पोलिसांच्या मदतीला 1700 हून अधिक गृहरक्षक दलाचे जवान उत्सव काळात कार्यरत राहतील. यासह अन्य बाबींचाही आढावा जिल्ह्यातील पोलीस अधिका-यांकडून घेतला.

The police will also be available during Ganeshotsav WEEKLY VACATIONS!!

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”