बाळासाहेबांच्या अनुयायांच्या राजकीय फटकेबाजीत विधिमंडळात रंगला तैलचित्र अनावरणाचा सोहळा


प्रतिनिधी

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यातील चित्र अनावरणाचा समारंभ थेट बाळासाहेब ठाकरे यांच्याच शैलीत त्यांच्या अनुयायांनी केलेल्या फटकेबाजीत आज महाराष्ट्र विधिमंडळात रंगला. यात भाषणे अनेकांची झाली. पण राजकीय फटकेबाजी रंगली, ती केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भाषणांची!!
या दोन्ही नेत्यांनी बाळासाहेबांच्या आठवणी समरसून सांगितल्या. राज ठाकरे यांनी तर आपल्या भाषणाची सुरुवातच इथे उपस्थित असणाऱ्या आणि इथे उपस्थित नसणाऱ्या अशा शब्दांच्या षटकाराने केली. The oil painting unveiling ceremony was staged in the Legislature amid the political lashing of Balasaheb’s followers.

आज जे नारायण राणे केंद्रीय मंत्री म्हणून उभे आहेत हे पद देखील बाळासाहेबांनीच दिल्यासारखे आहे, असे उद्गार नारायण राणे यांनी काढले. त्याचवेळी त्यांनी बाळासाहेबांच्या धगधगत्या हिंदुत्वाचा वैचारिक वारसा पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे घेऊन चाललेत हे देखील आवर्जून सांगितले.

विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी इतिहासात खोट राहू नये, असे सांगत बाळासाहेबांच्या काळात मुस्लिम लीगशी शिवसेनेने युती केल्याची आठवण करून दिली. ते फक्त हिंदूंच्या बाजूने होते असा गैरसमज होऊ नये, असे उद्गार त्यांनी काढले.

परंतु नारायण राणे, राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांनी बाळासाहेबांचे हिंदुत्व अधोरेखित केले. बाळासाहेबांचे तैलचित्र स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तैलचित्र शेजारी लागले आहे.

राज ठाकरे यांनी बाळासाहेबांबरोबरच्या अनेक व्यक्तिगत आठवणी शेअर केल्या. त्याच वेळी बाळासाहेब किती कडवट होते आणि किती मुलायम होते याचीही उदाहरणे त्यांनी पेश केली. सुरेशदादा जैन मुख्यमंत्री होणार असतील तर आपल्याला सरकार नको महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा मराठी माणूसच झाला पाहिजे यासाठी त्यांनी सरकारला 1999 साली लाथ मारल्याची आठवण राज ठाकरे यांनी करून दिली.

तर नारायण राणे यांनी राजकीय कटू निर्णय घ्यावे लागले तरी बाळासाहेबांनी उदारतेने आपल्याशी वर्तणूक ठेवल्याचे आवर्जून सांगितले. आपण आडवे जाणाऱ्या मांजरांना आणि कागदी वाघांना घाबरत नाही कारण आई-वडिलांनी केले त्यापेक्षा जास्त प्रेम बाळासाहेबांनी आमच्यावर केले. त्यामुळे मी, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे यांच्यासारखे कडवट शिवसैनिक केवळ बाळासाहेबांसाठी वेडे होतो. आज तसा शिवसैनिक अस्तित्वात नाही, असे परखड उद्गार नारायण राणे यांनी काढले.

The oil painting unveiling ceremony was staged in the Legislature amid the political lashing of Balasaheb’s followers.

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात