प्रतिनिधी
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून पायउतार होण्याची तयारी दाखवली आहे. Bhagat Singh koshiyari expressed desire to step down as governor of maharashtra
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन आणि चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी आज येथे दिली. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून ही माहिती दिली आहे.
चंद्रकांतदादा पाटलांची पुन्हा माफी; सगळ्यांवरच्या केसेस मागे घेण्याच्या सूचना
“महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही.
माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन आणि चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील,” असे राज्यपाल कोशियारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
महाविकास आघाडीचा राज्यपालांवर राग
राज्यपाल भगतसिंग कोशियारी हे आपल्या विविध वक्तव्यांनी वादग्रस्त झाले होते. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारने शिफारस केलेल्या 12 आमदारांची नियुक्ती देखील त्यांनी विधान परिषदेवर केली नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडीतले घटक पक्ष भगतसिंह कोशियारी यांच्यावर प्रचंड चिडून होते. महापुरुषांविषयी राज्यपालांनी अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप करून महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी त्यांच्याविरुद्ध मुंबईत मोर्चा देखील काढला होता. या मोर्चात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे नेते सामील झाले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App