वृत्तसंस्था
मुंबई : राज्यात निर्बंध शिथिल केल्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. राज्यात शनिवारी ९८१२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८७५२ जणांना डिस्चार्ज दिला आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक १५५१ रुग्ण आढळले. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा पुन्हा हॉटस्पॉटच्या मार्गावर आहे. The number of corona patients in the state is increasing again; On the way to Kolhapur hotspot
तिसऱ्या लाटेचा धोका पाहता सोमवारपासून राज्यात नवीन निर्बंधांची घोषणा केली आहे. दुसऱ्या लाटेत पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये कोरोना संसर्ग पसरला होता. या तिन्ही जिल्ह्यात रोज हजारच्या घरात नवीन रुग्णांची नोंद होत होती.
शासनाने कडक निर्बंध लावल्यानंतर तीन्ही जिल्ह्याची दैनदिन रुग्णसंख्या हजारच्या आत आली होती. मात्र, आता पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे. शनिवारी (२६ जून) जिल्ह्यात १५५१ नवीन बाधित आढळले आहेत तर २१ मृत्यू झाले आहेत. यामुळे प्रशासनाच्या चिंता वाढल्या असून कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App