मुलीच्या ऑलिम्पिक तयारीवर परिणाम होऊ नये म्हणून आईने लपवला बहिणीचा मृत्यू, परतल्यावर धावपटू धनलक्ष्मी विमानतळावरच ओक्साबोक्सी रडली


विशेष प्रतिनिधी

चेन्नई: मुलीच्या ऑलिम्पिकच्या तयारीवर परिणाम होऊ नये आईने काळजावर दगड ठेऊन तिच्या थोरल्या बहिणीचा मृत्यू लपवून ठेवला. कडवी झुंज देऊन धावपटू धनलक्ष्मी भारतात परतली. तिरुची विमानतळावर लोकांनी तिचे जंगी स्वागत केले होते. यावेळी तिला बहिणीच्या मृत्यूची बातमी समजल्यावर धनलक्ष्मी विमानतळावरच ओक्साबोक्सी रडली.The mother hid her sister’s death so that her daughter’s Olympic preparations, On her return, runner Dhanalakshmi cried at the airport

ऑलिम्पिकपटू धनलक्ष्मी हिचे तिरुची विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. भारताचा रिले संघ पराभूत झाला असला तरी कडवी झुंज दिली. त्यामुळे धनलक्ष्मीच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. मात्र, या स्वागतामुळे तिचा आनंद फार काळ टिकला नाही. विमानतळावरच एका नातेवाईकाने सांगितले की तिच्या मोठ्या बहिणीचा मृत्यू झाला आहे. त्यावेळी धनलक्ष्मी पतियाळा येथे सराव करत होती. तिच्या सरावावर परिणाम होऊ नये म्हणून आईने तिला बहिणीच्या मृत्यूबाबत कळविले नाही.धनलक्ष्मीची बहीण गायत्री 12 जुलै रोजी मरण पावली. पण धनलक्ष्मीला २३ जुलैला टोकियोला जायचे होते. तिची मनस्थिती बिघडू नये म्हणून आईने ही गोष्य तिच्यापासून लपविली.धनलक्ष्मी अत्यंत गरीब कुटुंबातून आली आहे. पंधरा वर्षांची असतानाच तिच्या वडलांचा मृत्यू झाला.

आईने काबाडकष्ट करून तिला वाढविले. गरीबीशी झुंज देत धनलक्ष्मी लहानपणापासूनच धावण्याचा सराव करत होती. मार्च महिन्यात पटियाला येथे झालेल्या फेडरेशन कप स्पर्धेमध्ये १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत धनलक्ष्मीने भारतीय ट्रॅकची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुती चंदविरुद्ध विजय मिळवला. त्यामुळे दुती चंद आणि हिमा दास यांच्यासोबत तिचे नाव घेतले जाऊ लागले. सर्वोत्तम कामगिरी केली ज्यामुळे तिला आॅलिम्पिकची संधी मिळाली. धनलक्ष्मीला संघात पर्याय म्हणून ठेवण्यात आले.

रिले संघाने सर्वोत्तम कामगिरी केली तरीही भारताचा पराभव झाला. यानंतर धनलक्ष्मी शनिवारी तिरुचीला परतली. विमानतळावर तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. या आनंदाच्या प्रसंगीच तिला मोठ्या बहिणीच्या निधनाबद्दल माहिती देण्यात आली. त्यावेळी धनलक्ष्मीचा बांध तुटला आणि रडू लागली. टीमने पुढच्या वेळी अधिक मेहनत करण्याचे आश्वासन दिले आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी धनलक्ष्मीला सरकारी नोकरीचे आश्वासन दिले.

धनलक्ष्मीची आई उषा म्हणाली, मी धनलक्ष्मीला तिच्या बहिणीच्या निधनाबद्दल सांगितले नाही कारण तिची मेहनत वाया जावी अशी माझी इच्छा नव्हती. माझी मोठी मुलगी नेहमी धनलक्ष्मीच्या कामगिरीवर लक्ष ठेवेल. मला आनंद आहे की धनलक्ष्मीने ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आणि तिच्या पाच वर्षांच्या मेहनतीचे फळ मिळाले.

ला आशा आहे की ती पुढच्या वेळी अधिक मेहनत करेल आणि ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवेल. पण हे पाहण्यासाठी तिची थोरली बहिण असणार नाही.तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी धनलक्ष्मीला सरकारी नोकरीचे आश्वासन दिले आहे.

The mother hid her sister’s death so that her daughter’s Olympic preparations, On her return, runner Dhanalakshmi cried at the airport

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था