समाजसेवेचा संस्कार तीन-तीन पिढ्यांपर्यंत राहणे ही खूप मोठी गोष्ट असल्याचे म्हणत आप्पासाहेब धर्माधिकारींच्या कार्याचे केले कौतुक
विशेष प्रतिनिधी
नवी मुंबई : पद्मश्री, ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र सरकारच्यावतीने आज सर्वात मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला. नवी मुंबईच्या खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर महाराष्ट्र भूषण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी जवळपास २० लाखांपेक्षा अधिक अनुयायांनी हजेरी लावली होती. याप्रसंगी अमित शाह यांनी आप्पासाहेबांच्या कार्याचे व शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुक करत, महाराष्ट्राच्या भूमीचीही प्रशंसा केली. The land of Maharashtra has kept three streams flowing in the country Amit Shahs Statement at the Maharashtra Bhushan Award Ceremony
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भाषणात म्हणाले, ‘’या प्रकारचा मान-सन्मान, भक्तीभाव केवळ आणि केवळ त्याग, समर्पण आणि सेवेतून निर्माण होतो. जो आप्पासाहेबांमध्ये आपल्या सर्वांना दिसतो. आप्पासाहेबांच्या प्रती तुमचं असणारं प्रेम हा त्यांच्या कर्तृत्वाचा, संस्कारांचा आणि नानासाहेबांच्या शिकवणीचा सन्मान आहे. असं म्हणतात की गर्दीचं अनुकरण करू नका, काही तरी असं करा की गर्दी तुमचं अनुकरण करेल. आप्पासाहेब तुम्ही असं करून दाखवलं आहे. लाखो-लाखो लोक तुमचं अनुकरण करण्यासाठी आज या कडक उन्हात जमले आहेत. ‘’
याचबरोबर ‘’मी वयाच्या बाराव्या वर्षापासून सार्वजनिक जीवनात आहे. मी इतिहासाची विद्यार्थी आहे. देश-विदेशाचा इतिहास चांगल्याप्रकारे मी वाचला आहे. मी अनेकदा पाहीलं आहे, की लक्ष्मीची कृपा एखाद्या परिवारावर अनेक पिढ्यांपर्यंत राहते, मी हेदेखील पाहिले आहे की एकाच परिवारात अनेक वीर एका पाठोपाठ एक जन्माला येतात आणि एका वीर परिवाराची निर्मिती होते. मी हेही पाहिले आहे की सरस्वतीची कृपाही अनेकदा अनेक कुटुंबांवर पिढ्यांपर्यंत राहते. मात्र समाजसेवेचा संस्कार तीन-तीन पिढ्यांपर्यंत राहणे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहीलं आहे. पहिले नानासाहेब, मग आप्पासाहेब आणि आता सचिनभाऊ व त्यांचे दोन्ही बंधू हा संस्कार पुढे नेत आहेत.’’ असंही अमित शाह म्हणाले.
महाराष्ट्र भूषण भव्य सोहळ्याच्या निमित्ताने शिंदे – फडणवीस सरकारचे प्रचंड शक्तिप्रदर्शन
याशिवाय, ‘’मी आज या ठिकाणी मनातून सांगू इच्छितो, की आप्पासाहेब महाराष्ट्र शासनाने तुम्हाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन, केवळ तुमचा सन्मान केला नाही, तर महाराष्ट्र भूषण सन्मान देऊन लाखो लाखो लोकांना तुमच्याप्रमाणे जगण्याची प्रेरणा देण्याचं कामही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मी सर्वांना म्हणू इच्छितो की एकदा महाराष्ट्र शासनासाठी जोरदार टाळ्या वाजवून योग्य सन्मानाचे समर्थन करावे.’’ असं म्हणत महाराष्ट्र सरकारचे अमित शाह यांनी कौतुक केले.
https://youtu.be/h-N7vOFaA_8
तर, ‘’मी महाराष्ट्राच्या भूमीवर आहे, रायगडमध्ये आहे. महान छत्रपती शिवाजी महाराजांची ही पुण्यभूमी आहे, या भूमीने देशात धारा अविरत प्रवाहीत ठेवल्या आहेत. सर्वात प्रथम देशासाठी बलिदान देण्याची वीरतेची धारा, जी वीर शिवाजी महाराजांनी सुरू केली, वीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधु आणि लोकमान्य टिळक यांच्यासारख्यांनी देशभरात महाराष्ट्राच्या भूमीतून उठून स्वराज्य आणि सन्मानासाठी आपलं जीवन समर्पित केलं. दुसरी धारा भक्तीची धारा आहे. समर्थ रामदासापासून सुरू होऊन, संत तुकारामांपासून संत नामदेवांपर्यंत भक्तीच्या क्षेत्रात महाराष्ट्राने नेहमीच या देशाचा मार्गाचे नेतृत्व करण्याचे काम केले आहे. तिसरे देखील अतिशय कमी राज्यांमध्ये पाहायला मिळते, परंतु तिसरा प्रवाह सुद्धा येथूनच सुरू झाला. सामाजिक जाणीवेची धारा. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर किंवा अनेक सामाजिक आंदोलनाची सुरुवात ही महाराष्ट्राच्या भूमीतच झाली. नानासाहेब, आप्पासाहेबांनी हीच सामाजिक जाणीव जागृत ठेवण्याचा आणि हे कार्य पुढे नेण्याचा खूप महान कार्य केले आहे.’’ असं म्हणत महाराष्ट्राच्या भूमीची प्रशंसा केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App