सरकारने नाही लोकांनीच करून दाखविले, मुंबईतील धारावी, पुण्यातील भवानी पेठेत मिळाला नाही एकही कोरोना रुग्ण

कोरोनाच्या पहिल्या लाटेचा मोठा फटका बसलेल्या मुंबईतील धारावी आणि पुण्यातील भवानी पेठेतील लोकांनी करून दाखविले आहे. त्यावेळी कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या या भागात रुग्णसंख्या कमी होत आहे. सोमवारी तर धारावी आणि भवानी पेठेत कोरोनाचा एकही नवा रुग्ण मिळाला नाही.The government did not do, not a single corona patient was found in Dharavi in ​​Mumbai, Bhavani Peth in Pune


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोनाच्या पहिल्या लाटेचा मोठा फटका बसलेल्या मुंबईतील धारावी आणि पुण्यातील भवानी पेठेतील लोकांनी करून दाखविले आहे. त्यावेळी कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या या भागात रुग्णसंख्या कमी होत आहे. सोमवारी तर धारावी आणि भवानी पेठेत कोरोनाचा एकही नवा रुग्ण मिळाला नाही.

कोरोना संसर्गाच्या दुसºया लाटेत धारावीत पहिल्यांदा शून्य रुग्ण संख्या नोंदवण्यात आली आहे. गेल्या 24 तासात तेथे एकही रुग्ण सापडला नाही. धारावीत दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या प्रथमच शून्यावर आली आहे. जी / उत्तर वॉर्डमधील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी मुंबई पालिकेनं जाहीर केली. या वॉर्डमध्ये केवळ 9 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.त्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत पहिल्यांदा एकही रुग्ण आढळून आला नाही. याआधी एक दिवस हा आकडा दोन वर होता. सध्या धारावीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 हजार 861 इतकी आहे. दादरमध्ये 3 तर माहिममध्ये 6 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत.

दादरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या 9 हजार 557 इतकी आहे. माहिममध्ये कोरोनाबाधितांची एकूण आकडा 9 हजार 876 वर पोहोचला आहे.जी/ उत्तर वॉर्डमध्ये एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 26 हजार 294 इतका झाला आहे.

पुण्यातील भवानी पेठेतही गेल्या २४ तासांत एकही नवा रुग्ण सापडलेला नाही. भवानी पेठेत पहिल्या लाटेत सर्वाधिक रुग्ण सापडले होते. मृत्यूचे प्रमाणही जास्त होते. सध्या याठिकाणी सक्रीय कोरोना रुग्णांची संख्याही तीसपेक्षा कमी आहे.

The government did not do, not a single corona patient was found in Dharavi in ​​Mumbai, Bhavani Peth in Pune