वृत्तसंस्था
जळगाव : महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी जळगावमध्ये गेला आहे.एका शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. शेतात काम करून घरी परतत असताना उन्हाचा फटका बसल्यामुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे ही घटना घडली आहे. जितेंद्र संजय माळी असे शेतकऱ्याचे नाव आहे. जितेंद्र माळी दुपारपर्यंत रस्त्यावर खमंग विकले आणि त्यानंतर शेतात कामाला गेले होते. शेतातून काम करून येत असताना उन्हाचा फटका बसला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. The first victim of heatstroke in Maharashtra, Death of a farmer in Jalgaon
जळगाव जिल्ह्यात २७ ते ३१ मार्च दरम्यान उष्णतेची लाट येणाचे संकेत हवामान विभागाने दिले होते. त्यानुसार, जिल्हा प्रशासनाकडून वाढत्या तापमानाच्या दुष्परिणामाची शक्यता लक्षात घेता, जिल्हा आरोग्य यंत्रणा, जिल्हा परिषद यांना जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुका ग्रामीण रुग्णालये तसंच उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापन करण्यासह अन्य आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राऊत यांनी दिले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App