श्री क्षेत्र नृसिंहवाडीत दत्त नामाच्या जयघोषात पहिला दक्षिणद्वार सोहळा अपूर्व उत्साहात


वृत्तसंस्था

कोल्हापूर : श्री क्षेत्र नृसिंहवाडी (जि.कोल्हापूर ) येथील दत्त मंदिरात वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा शुक्रवारी (ता.१८) पहाटे मोठ्या उत्साहात झाला. The first Dakshinadwar ceremony in Shri Kshetra Nrusinhwadi with the chanting of Datta Nama

येथील प्रसिद्ध दत्त मंदिर पूर्वाभिमुख आहे. दत्त मंदिरासमोर वाहणारी कृष्णा नदी उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे वाहते. पावसाळ्यात नदीचे पाणी वाढल्याने मुख्य मंदिराच्या उत्तरद्वारातून कृष्णानदीचे पाणी मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करून श्रींच्या मनोहर पादुकांना स्पर्श करीत मंदिराच्या दक्षिणद्वारातून बाहेर पडते. यालाच दक्षिणद्वार सोहळा असे म्हंटले जाते.



यावेळी मुख्य मंदिराच्या दक्षिणद्वारातून बाहेर पडण्याऱ्या नैसर्गिक तीर्थात स्नान करणे पुण्यकारक मानले जाते. तसेच या सोहळ्यात स्नान केल्याने पापाचा ऱ्हास होवून मानवाला पुण्यप्राप्ती होते,अशी भाविकांची धारणा आहे. त्यामुळे सोहळ्यात स्नान करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात.

दक्षिणद्वार स्नान हा योगायोगच

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दक्षिणद्वार सोहळ्यात स्नान करणे हा योगायोगच असतो. कारण नदीचे पाणी वाढणे आणि कमी होणे हे निसर्गावर अवलंबून असून एक ते दीड फूट पाणी वाढले अथवा कमी झाले असता हा सोहळा संपतो.

The first Dakshinadwar ceremony in Shri Kshetra Nrusinhwadi with the chanting of Datta Nama

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात