आर्यन खानविरूद्धची कलमेच अशी गंभीर आहेत की त्याला होऊ शकते 10 वर्षांची शिक्षा!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई – गोवा क्रूजवरील ड्रग्ज रेव्ह पार्टी संदर्भात अटक करण्यात आलेल्या सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि त्याच्या आठ साक्षीदारांविरुद्ध लावलेली फौजदारी कायद्यातील कलमेच एवढी गंभीर आहेत की त्यांना १० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. आर्यन खान याच्या बाजूने कोर्टात उभे राहण्यासाठी शाहरुख खानने सतीश माने शिंदे यांच्या सारखा प्रख्यात फौजदारी वकील दिला आहे. तरी देखील कलमेच एवढी गंभीर आहेतलकी त्यातून सुटका होण्याची शक्यता फार कमी आहे. The charges against Aryan Khan are so serious that he could be sentenced to 10 years !!

मुंबई – गोवा क्रुजवर करण्यात आलेल्या कारवाईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने शाखरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आठही जणांकडून काही प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केले.

एनसीबीने या सर्वांविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील कलमांपैकी २०(बी) या कलमात १० वर्षे कारावास आणि एक लाख रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. आर्यन खानसह पकडण्यात आलेल्या आठही जणांकडून एनसीबीने १३ ग्राम कोकेन, ५ ग्राम एमडी, २१ ग्राम चरस, एमडीएमच्या २२ गोळ्या आणि १ लाख ३३ हजार रोकड हस्तगत केली होती.१० वर्ष शिक्षेची तरतूद

आठही जणांविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत(एनडीपीएस अॅक्ट) कलम २० बी, ८(सी)२७ आणि ३५ सह कलम लावण्यात आले आहे. कलम २० (बी) कलमात जो कोणी या कायद्याचे उल्लंघन करतो किंवा दिलेल्या नियमांचे वा अटींचे पालन न करता अंमली पदार्थांची आंतरराज्यीय आयात-निर्यात केल्यास, तसेच अंमली पदार्थ व्यापारी प्रमाणापेक्षा कमी असतील तर त्यात १० वर्षे शिक्षा आणि एक लाख रुपयांचा दंड होऊ शकतो.

…तर जामीन देखील मिळू शकत नाही

कलम २७ कोणत्याही अंमली पदार्थ किंवा सायकोट्रॉपिक पदार्थाच्या वापरासाठी शिक्षेची तरतूद करते. त्यात असे म्हटले आहे की, जो कोणीही अंमली पदार्थ किंवा सायकोट्रॉपिक पदार्थाचे सेवन करतो त्याला शिक्षा होईल. कलम २७ अंतर्गत सेवन करण्याची शिक्षा खूपच कमी आहे. जामिनासंदर्भात एनडीपीएस कायद्याचा आणखी एक मनोरंजक पैलू आहे.

व्यावसायिक प्रमाण असलेल्या गुन्ह्यांसाठी सरकारी वकील जामीनाला विरोध करत असल्यास आरोपीला जामिनावर सोडता येत नाही. जर आरोपी अशा गुन्ह्यासाठी दोषी नाही आणि जामीनावर असताना त्याने कोणताही गुन्हा करण्याची शक्यता नाही असे न्यायालयाला वाटत असेल तरच अशा प्रसंगी जामीन मंजूर केला जाऊ शकतो.

The charges against Aryan Khan are so serious that he could be sentenced to 10 years !!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण