वृत्तसंस्था
बीड : ड्रग्स घेणाऱ्याच्या विरोधातला कायदा बदलण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. दोंडाईचा वरवाडे नगर परिषद येथे विविध विकास कामांच्या लोकार्पणसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले धुळे दौऱ्यावर आले होते. यावेळी लोकार्पण सोहळ्या दरम्यान आठवले यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. The central government’s plan to change the law against drug users; Union Minister Ramdas Athvle
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सिगारेट व दारू पिणाऱ्याला जसे तुरुंगात टाकत नाही. त्याप्रमाणेच ड्रग्स घेणाऱ्याला तुरुंगात टाकण्या ऐवजी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये पाठवावे. अशा पद्धतीने ड्रग्स घेणाऱ्याच्या विरोधातला कायदा बदलण्याच्या विचारात केंद्र सरकार आहे.
ड्रग्स पार्टी प्रकरणातील मुख्य तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर मंत्री नवाब मलिक यांच्याकडून व्यक्तिगत होत असलेल्या आरोपांचा देखील मंत्री रामदास आठवले यांनी समाचार घेतला. नवाब मलिक यांनी ड्रग्स संदर्भात आरोप करावेत. परंतु समीर वानखेडे यांच्यावर व्यक्तिगत आरोप करू नयेत, असे म्हणत नवाब मलिक हे सामील असलेले सरकार हे ड्रगला पाठिंबा देणार सरकार आहे. समीर वानखेडेला बदनाम करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्य सरकार करत असल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App