१०० कोटी वसुली प्रकरणातला सर्वात मोठा खुलासा .. नक्की काय ते वाचा 


मार्चमध्ये अग्रवाल यांचा अगदी पूर्वीचा भागिदार संजय पुनामिया यांच्यासोबत एक बैठक झाली होती.यामध्ये एनआयए लवकरच महाराष्ट्रातील ४ ते ५ मंत्र्यांची चौकशी करणार आणि महाविकास आघाडी सरकार अडचणीत येऊन कोसळणार , अशी चर्चा त्या बैठकीत झाली होती, असा खुलासा अग्रवाल यांनी आपल्या जबाबात केला आहे. The biggest revelation in the 100 crore recovery case .. read exactly what it is


विशेष प्रतिनिधी

मुंबई : माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांच्या विरोधात खंडणीची तक्रार करणारा उद्योजक श्याम अग्रवालने आपल्या जबाबात एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. मार्चमध्य अग्रवाल यांच्या अगदी पूर्वीच्या भागीदाराने परमवीर यांची भेट घेतली.

यामध्ये एनआयए लवकरच महाराष्ट्रातील ४ ते ५ मंत्र्यांची चौकशी करेल आणि महाविकास आघाडी सरकार अडचणीत येऊन कोसळेल, अशी चर्चा त्या बैठकीत झाली होती, असा खुलासा अग्रवाल यांनी आपल्या जबाबात केला आहे.

मुंबई पोलिसांनी परमबीर सिंह यांच्या विरोधात उद्योजक अग्रवाल यांच्याकडून १५ कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पुनामिया आणि त्याचा सहकारी सुनील जैन या दोघांना अटक करण्यात आली.



अग्रवाल आणि पुनामिया यादोघांची भागिदारी २०११ मध्ये वादामुळे संपुष्टात आली. त्यानंतर पुनामियाने अग्रवाल यांच्या विरोधात खंडणी आणि फसवणूकीचे जवळपास १८ गुन्हे दाखल केले होते, अशी माहिती अग्रवाल यांनी पोलिसांना दिली.

या वर्षी २० आणि २३  मार्चला तडजोड करण्यासाठी मी पुनमिया यांची भेट घेतली होती. त्या बैठकीत झालेले संभाषण अग्रवाल यांनी रेकॉर्ड करून ठेवले होते . त्याच्या आधारानेच त्यांनी परमबीर सिंह आणि इतरांच्या विरोधात तक्रार दाखल केली.

बैठकीवेळी पुनमिया म्हणाला होता की १०० कोटी प्रकरणात लवकरच सीबीआय चौकशी सुरू करेल. तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) चार ते पाच मंत्र्यांची चौकशी होईल, ज्यामुळे सरकार अडचणीत येऊन कोसळणार आहे. पुनामियाचे हे वाक्य मी ऐकले होते, असे अग्रवाल यांनी आपल्या जबाबात म्हटलयं.

The biggest revelation in the 100 crore recovery case .. read exactly what it is

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात