वृत्तसंस्था
पुणे : हडपसर येथील गोसावीवस्ती परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात रेस्क्यू टीमला मंगळवारी रात्री ११ वाजता यश आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.The Aggressive leopard was finally captured by the rescue team in Hadpsar of Pune
गावदेवी मंदिर परिसरात मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या व्यक्तीवर बिबट्याबे हल्ला करून जखमी केले होते. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास रेस्क्यू टीमकडून त्याला जेरबंद करण्यात आले. साडे आकरा वाजता पिंजऱ्यातून बिबट्याला कात्रज प्राणी संग्रहालयात नेण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
मंगळवारी (ता.२६) संभाजी आटोळे व अमोल लोंढे हे सिरम इन्स्टिट्यूट मागील गावदेवी मंदिर परिसरात मॉर्निंग वॉकला गेले होते.तेथे पेव्हिंग ब्लॉकचा ट्रॅक आहे. मैदानावर गवत वाढले आहे. या ट्रेकवर हे दोघे चालत होते.गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने आटोळे यांच्या अंगावर झेप घेतली होती.
लोंढे यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने वस्तीकडे पलायन केले. हल्ल्यात पंजा मारल्याने आटोळे यांच्या छाती, कबंर, हात, पाय व मांडीवर जखमा झाल्या होत्या. त्यांच्यावर ससून रूग्णालयात उपचार केले होते. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती.
रात्री आठ वाजण्याच्या सुमारास भर वस्तीतील सचिन आटोळे व विश्वास गायकवाड यांना दोन घरामधील मोकळ्या जागेत बिबट्या बसलेला दिसला. त्यांनी पाहऱ्यावरील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली. त्यांनी रेस्क्यू टीमला बोलावून घेतले. नऊ वाजता बिबट्याला पकडण्यासाठी तयारी केली.
अखेर दोन तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला पकडण्यात आले. रेस्क्यू टीम व पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच तरूणांनी चोहोबाजूंनी जाळी लावली. तसेच बिबट्याला गनच्या साह्याने तीन इंजेक्शन मारून बेशुध्द केले. त्यानंतर जेरबंद केले.वनपरिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस म्हणाले, “बिबट्या सुमारे दोन वर्षांचा आहे. वजन पंचावन्न ते साठ किलोपर्यंत आहे. सध्या त्याला कात्रज प्राणी संग्रहालयात पाठविले आहे.’
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App