उत्तर प्रदेश, गोवा विधानसभांच्या निवडणुकीत बडबोलेपणा करून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठ्या मोठ्या बाता मारल्या. उत्तर प्रदेशात योगी सरकारला हादरवून गोव्यात भाजपचा सुपडा साफ करू, अशा बाता शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत मारत होते.Thackeray – Pawar; Star preachers did not see the propaganda, did not fall
गोव्यात अतिशय महत्त्वाकांक्षेने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार मैदानात उतरवले होते. पण प्रत्यक्षात या दोन्ही पक्षांची अवस्था अशी होती की उमेदवारांची संख्या कमी आणि स्टार प्रचारकांची संख्या जास्त…!! राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तर प्रदेश, गोव्यासाठी 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. यामध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यासह आमदार खासदारांची नावे होती. प्रत्यक्षात एकही स्टार प्रचारक ना गोव्यात फिरकला ना उत्तर प्रदेशात फिरकला…!! गोव्यात राष्ट्रवादीने 12 उमेदवार उभे केले होते. उत्तर प्रदेशात 40 उमेदवार उभे केल्याचे सांगण्यात आले, पण त्यातल्या 12 उमेदवारांचे अर्ज रद्द झाल्याचे लपवण्यात आले.
अशा स्थितीतही मराठी माध्यमांनी शरद पवार उत्तर प्रदेशात “गेमचेंजर” ठरणार अशा बातम्या चालवून दाखवल्या होत्या. पण प्रत्यक्षात काय झाले…?? “सुपडा साफ होणे”, “धुव्वा उडणे” वगैरे शब्द देखील कमी पडतील अशी राष्ट्रवादीची आणि शिवसेनेची गोवा आणि उत्तर प्रदेशात अवस्था झाली आहे. ना तिकडे स्टार प्रचारक यांचा प्रचार दिसला ना तिथे कुणाचा प्रभाव पडला…!!
एकीकडे दिल्ली सोडून पंजाबमध्येही सत्ता मिळवून जनमताच्या बळावर अरविंद केजरीवाल राष्ट्रीय राजकारणाच्या दरवाजावर ठामपणे उभे राहताना दिसत आहेत, तर दुसरीकडे गेली 30 वर्षे पंतप्रधानपदासाठी पत्रकारांनी मैदानात “उभे ठेवलेले” शरद पवार महाराष्ट्रात नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये म्हणून जंगजंग पछाडत आहेत. ही यांची “राष्ट्रीय” पातळीवर अशा राजकारणाची पात्रता आहे.
– आदित्य ठाकरे यांचा प्रचार
नाही म्हणायला संजय राऊत यांच्या बरोबर फिरून आदित्य ठाकरे यांनी गोवा आणि उत्तर प्रदेशात प्रचार जरूर केला. तेथे शिवसेनेचा प्रचार सभांना काही गर्दीही जमली होती. शिवसेनेच्या खासदारांची हिंदीतली चांगली भाषणे झाली होती. पण तिथे गर्दीचे रुपांतर मतांमध्ये करायला शिवसेनेचे संघटनाच नव्हती. प्रचार सभांचा अपवाद वगळता शिवसेनेला तिथे फारसे काही मिळण्याची शक्यताही नव्हती पण या निमित्ताने तरुण वयात आदित्य ठाकरे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या बाहेर पडून प्रचार करून आले ही वस्तुस्थिती देखील नाकारता येणार नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App