Thackeray-Pawar govt defending Anil Deshmukh, challenges HC Order Of CBI Probe In Supreme Court

देशमुखांच्या बचावासाठी उतरले ठाकरे-पवार सरकार, हायकोर्टाच्या CBI चौकशीच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान

Thackeray-Pawar govt defending Anil Deshmukh : ठाकरे सरकारने अनिल देशमुख यांच्याकडून महाराष्ट्राच्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा घेतला असला तरी त्यांच्याविरोधात CBI चौकशीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले होते. या निर्णयाला ठाकरे सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. Thackeray-Pawar govt defending Anil Deshmukh, challenges HC Order Of CBI Probe In Supreme Court


विशेष प्रतिनिधी

मुंबई : ठाकरे सरकारने अनिल देशमुख यांच्याकडून महाराष्ट्राच्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा घेतला असला तरी त्यांच्याविरोधात CBI चौकशीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले होते. या निर्णयाला ठाकरे सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर निलंबित एपीआय सचिन वाझेला मुंबईतील हजारो बार आणि रेस्तराँमधून दरमहा तब्बल 100 कोटींची वसुली करण्यास सांगितले होते, असा आरोप केला होता. परमबीर सिंग यांच्या आरोपांनंतर अवघ्या देशात खळबळ उडाली होती. याप्रकरणी अॅड. जयश्री पाटील यांनी देशमुखांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने देशमुखांवरील आरोप अत्यंत गंभीर असल्याचे सांगत, त्यांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

उच्च न्यायालयाच्या या निर्णयाच्या नंतरच अनिल देशमुख यांनी नैतिकतेचे कारण देऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला. सीएम उद्धव ठाकरे यांना राजीनामा देताना अनिल देशमुख यांनी आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे स्पष्टपणे म्हटले होते. दुसरीकडे, राज्यातील विरोधी पक्ष भाजपने सुरुवातीपासूनच याप्रकरणी आक्रमकपणे देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. देशमुखांचा राजीनामा आलेला असला तरी त्यांची पुढील वाट बिकटच असणार हे आता स्पष्ट झालेले आहे.

Thackeray-Pawar govt defending Anil Deshmukh, challenges HC Order Of CBI Probe In Supreme Court

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*