ठाकरे- पवार सरकारमुळे महाराष्ट्र बनला कोरोनाची राजधानी – आशिष शेलार


प्रतिनिधी

सांगली : ठाकरे -पवार सरकारमुळेच महाराष्ट्र कोरोनाची राजधानी बनला आहे. कोरोनाला नियंत्रणामध्ये ठेवण्यात सरकार अपयशी ठरले आहे. एकेकाळी जी महाराष्ट्राची सकारात्मक ओळख होती. त्याला ठाकरे सरकारने गालबोट लावले आहे. ठाकरे- पवार सरकारची वृत्ती रक्तपिपासू आहे, अशी जोरदार टीका भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी सांगलीत केली. शेलार हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. Thackeray- Pawar government made Maharashtra as a Capital of Corona: Ashish Shelar

देशासह महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना पुन्हा राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याबद्दल तसेच उपाययोजनांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल तीव्र चिंता त्यांनी व्यक्त केली.मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा

महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केला. मराठा आरक्षण रद्द होण्यामागे महाविकास आघाडी सरकारचा कुटील डाव आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने बोटचेपे धोरण ठेवले, तर भाजप आणखीन आक्रमक आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

सांगलीच्या लसी जालन्याकडे कोणी पळवल्या

लसीकरणात मिस मॅनेजमेंट हे राज्य सरकारकडून होत आहे,असा आरोप करताना ते म्हणाले, सांगलीच्या लसी जालन्याकडे कोणी पळवल्या ? एकट्या जालनाकडे एवढ्यामोठ्या प्रमाणात लसी कशा काय गेल्या ?, सांगलीतील अपेकस हॉस्पिटलला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात जाणार आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी.

Thackeray- Pawar government made Maharashtra as a Capital of Corona: Ashish Shelar

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण