मुंबई पोलीसांचे ऐवढे खच्चीकरण आणि बदनामी कधीही झाली नव्हती, आशिष शेलार यांचा आरोप

दुर्दैवाने एवढे मुंबई पोलिसांचे खच्चीकरण आणि बदनामी कधीच झाली नव्हती, ठाकरे सरकारचे हे पाप आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे खासदार आशिष शेलार यांनी केली आहे.Ashish Shelar alleges that the Mumbai Police has never been so slandered and discredited


विशेष प्रतिनिधी

मुंबई : दुर्दैवाने एवढे मुंबई पोलिसांचे खच्चीकरण आणि बदनामी कधीच झाली नव्हती, ठाकरे सरकारचे हे पाप आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे खासदार आशिष शेलार यांनी केली आहे.

सचिन वाझे प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंग यांच्यावर टीका केली जात होती. त्यांच्या बदलीची चर्चा देखील सुरू होती. अखेर राज्य सरकारने त्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. या पार्श्वभूमीवर शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.शेलार म्हणाले, एका सामान्य नागरिकाचा खून, एक एपीआयला अटक, त्याच्या गाडीत नोटांची बंडल, नोटा मोजण्याचे मशीन, गाडीत नंबर प्लेटचा खच. त्यावरून मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या. दुर्दैवाने मुंबई पोलिसांचे एवढे खच्चीकरण आणि बदनामी कधीच झाली नव्हती. ठाकरे सरकारचे हे पाप आहे!

वाझे यांची पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने, आता मुंबई पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांची बदली करून मोठी कारवाई केल्याचा आव आणला असला, तरी ही कारवाई म्हणजे वरवरची मलमपट्टी आहे.ह्व अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

पाटील म्हणाले, राजकीय आशीवार्दामुळे एक पोलीस अधिकारी सरकारी यंत्रणा वापरून गुन्हे करत असल्याचे चित्र निर्माण झाले असून, राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती धोक्यात आली आहे. सरकारने या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे.

Ashish Shelar alleges that the Mumbai Police has never been so slandered and discredited

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*