लातूरमध्ये मुस्लिमांसाठी स्वतंत्र युनानी कॉलेज उभारण्याची ठाकरे सरकारची घोषणा!!

विशेष प्रतिनिधी

लातूर : शिवसेना जरी हिंदुत्वाचा टेंभा मिरवत असली तरी ती ज्यांच्या सोबत सत्तेत आहे, त्या दोन्ही काँग्रेसच्या आग्रहाखातर अल्पसंख्यांकांना चुचकरणारे निर्णय ठाकरे सरकारला मान्य करावे लागत आहेत. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. Thackeray government announces to set up an independent Unani College for Muslims in Latur !!

ठाकरे सरकारमधील वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी लातूर येथे खास मुस्लिमांसाठी स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे याची घोषणाही त्यांनी अल्पसंख्यांक मुलींच्या शासकीय वसतीगृहाच्या उद्घाटन सोहळ्यात केली आहे.

अल्पसंख्याक समाजासाठी स्वतंत्र रुग्णालय

सरकारी यूनानी मेडिकल कॉलेजची लातुरात लवकरच सुरुवात करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच राज्यात खास अल्पसंख्यांक समुहासाठी सरकारी वैद्यकीय रुग्णालय आणि कॉलेज सुरु करण्याच्या हालचाली सुरू आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. लातूर येथे अल्पसंख्यांक मुलींच्या शासकीय वसतीगृहाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते.



अल्पसंख्याक समाजात असुरक्षितता

लातूर येथे अल्पसंख्यांक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी शासकीय वसतीगृहाच्या इमारातीचे लोकार्पण करण्यात आले. 100 मुलींच्या राहण्याची व्यवस्था या ठिकाणी होणार आहे. अल्पसंख्यक समाज मागील काही दिवसांत स्वत:ला असुरक्षित समजत आहे. परंतु राज्य सरकार त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे, असे आश्वासन यावेळी अमित देशमुख यांनी दिले.

मंत्रिमंडळात विचार विनिमय

अल्पसंख्यांक समाजाने कायम लातूर आणि नांदेडच्या नेतृत्वाला साथ दिली आहे. लवकरच अल्पसंख्यांक समाजातील मुलींसाठी वसतीगृहाची निर्मित करण्यात येणार आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी लातुरात सरकारी यूनानी मेडिकल कॉलेजची सुरुवात करण्यात येणार आहे. आम्ही यावरच थांबलो नसून राज्य स्तरावर खास अल्पसंख्याक समाजासाठी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालये निर्माण करण्यात येणार आहेत. याबाबत मंत्रिमंडळात विचार विनिमय होत आहे.

Thackeray government announces to set up an independent Unani College for Muslims in Latur !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात