सणांवरील निर्बंधामुळे ठाकरे बंधू आमने- सामने; राज ठाकरे आक्रमक तर उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या पत्राकडे लक्ष वेधले


वृत्तसंस्था

मुंबई : सण आणि उत्सवावरील निर्बंध या मुद्यावरून ठाकरे बंधू आमने- सामने आले आहेत. सण आणि उत्सवाला परवानगी द्यावी, अशी आक्रमक मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. याच मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना आणि लोकांच्या जीवाची काळजी असल्यामुळे निर्बंध लागू केल्याचे स्पष्ट केले. तसेच केंद्र सरकारने काळजी घेण्याचे पत्र पाठविल्याने निर्बध शिथील करता येत नसल्याचे सांगितले. Thackeray brothers face to face due to restrictions on festivals; Raj Thackeray was aggressive while Uddhav Thackeray drew attention to the central government’s letter

कोरोनामुळे राज्यात दहीहंडी आणि गणेशोत्सवावर सरकारकडून निर्बंध घालले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दहीहंडीवरुन मनसे आणि भाजप नेते आक्रमक झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे बंदीवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तुमची बाहेर पडायला फाटते, त्यामध्ये आमचा काय दोष, असा जळजळीत सवाल करून सरकारला लक्ष्य केले.राज्यात सण साजरे करण्यास आणि मंदिरे उघडण्यास परवानगी दिलीच पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. त्यावर आता मुख्यमंत्र्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले ?

आरोग्य विषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना यात्रा काढायच्या आहेत, जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. हे खुप दुर्देवी आहे. हे काही स्वातंत्र्यासाठीचे आंदोलन नाही, हा जनतेच्या जीविताचा प्रश्न आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता केंद्र सरकारने व्यक्त केली आहे. त्यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात गर्दी टाळावी, असे राज्याला पत्र पाठवून कळवले आहे. जे आंदोलन करणाऱ्याना केंद्र सरकारचे हे पत्र दाखवायचे आहे, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी भाजप आणि मनसेला लगावला.

‘गर्दी करुन सण साजरे करण्याची वेळ नाही

महाविकास आघाडी सरकार कोणत्याही सण-समारंभांविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे. कोरोनाला अटकाव करण्यासाठी शिस्त आणि नियम याचे पालन करावेच लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले. तसंच केंद्र सरकारनेही सणांच्या दरम्यान संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करून राज्य सरकारला काळजी घ्यायला सांगितल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

स्टुलावर उभं राहून हंडी फोडायची? : राज ठाकरे

दहीहंडीच्या सणावर निर्बंध लादले आहेत. जास्त थर रचू नका, असे सांगितले जाते. थर लावायचे नाहीत तर मग दहीहंडी स्टुलावर उभं राहून फोडायची का? या सगळ्याला काही अर्थ नाही. त्यामुळे मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना बाहेर पडून सण साजरे करण्यास सांगितल्याचे राज यांनी म्हटले.

Thackeray brothers face to face due to restrictions on festivals; Raj Thackeray was aggressive while Uddhav Thackeray drew attention to the central government’s letter

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात