प्रतिनिधी
मुंबई : दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल लवकरच जाहीर होणार आहेत. 10 जूनपर्यंत दहावी तर 20 जूनपर्यंत बारावीचे निकाल जाहीर होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने स्पष्ट केले आहे. Tenth, Twelfth Exam Result Dates Announced
परीक्षेच्या शेवटच्या पेपरनंतर 60 दिवसांच्या कालावधीत निकाल जाहीर केला जातो. पण यंदा बारावीचा पेपर 15 दिवस उशिरा सुरु झाला. त्यामुळे बारावीचा निकाल उशिरा म्हणजे 10 जूनपर्यंच जाहीर केला जाणार असल्याचे महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सांगितले आहे.
यंदा दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App