गेल्या २७ वर्षांत मुंबईचे तापमान दोन अंशांनी वाढले; ४० टक्के जंगलही गमावले


विशेष प्रतिनिधी

मुंबई – १९९१ ते २०१८ दरम्यान मुंबईने ८१ टक्के मोकळ्या जागा, ४० टक्के हरित आच्छादन आणि सुमारे ३० टक्के जल क्षेत्र गमावले आहे. त्यामुळे या २७ वर्षांतच मुंबईच्या तापमानात सरासरी दोन अंश सेल्सिअसने वाढ झाल्याची चिंताजनक बाब एका संशोधनातून समोर आली आहे.Temp. in Mumbai incresed

हा अभ्यास ‘इंडियन रिमोट सेन्सिंग जर्नल’ मध्ये प्रकाशित झाला आहे. नवी दिल्ली येथील जमिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, हैदराबादेतील उस्मानिया विद्यापीठ आणि अलिगड मुस्लिम विद्यापीठ येथील संशोधकांनी हे निष्कर्ष मांडले आहेत.यासाठी संशोधकांनी उपग्रहावर आधारित प्रतिमांचा वापर करत मुंबई शहर आणि उपगनरांतील एकूण ६०३ चौरस कि.मी. प्रदेशाचा अभ्यास केला.अहवालानुसार, मुंबईच्या तापमानवाढीस केवळ हवामान बदल कारणीभूत नाही; तर यासाठी जमीन वापराच्या पद्धतीत झालेला बदलही तेवढाच महत्त्वाचा ठरला आहे.

१९९१ ते २०१८ या काळात मुंबईतील बांधकाम क्षेत्रफळात ६६ टक्क्यांनी वाढ झाली. बांधकामामध्ये वापरली जाणारी काँक्रीटसारखी साधनसामग्री हे तापमानवाढीस सर्वांत प्रमुख कारण असल्याचे यात म्हटले आहे.

Temp. in Mumbai incresed

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण