पवार – राऊत : संयुक्त मुलाखतीचे खरे विवरण; बाळासाहेबांचे हिंदुत्वापासून पद्धतशीरपणे विलगीकरण!!


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि संजय राऊत यांच्या संयुक्त मुलाखतीच्या बातम्या आणि प्रसार माध्यमांनी विविध हेडलाइन्सने दिल्या आहेत. त्यावर अनेकांनी भाष्य देखील केली आहेत. सोशल मीडिया देखील त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पण एवढे असूनही शरद पवार आणि संजय राऊत यांनी चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांना दिलेल्या मुलाखतीचे राजकीय टाइमिंग आणि त्या मुलाखतीत या प्रश्नांना दिलेली उत्तरे यांचे नेमके रहस्य फारसे कुणी उलगडून सांगताना दिसत नाही!! Systematic separation of Balasaheb from Hindutva

– पवारांचे नॅरेटिव्ह सेटिंग

मूळात प्रश्न विशिष्ट नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी विचारलेले… त्यामुळे उत्तरे ही तशीच “अपेक्षित”… क्रॉस क्वेश्चनिंग तर अजिबात नाही… पवारांना तुम्ही पाऊस आणि ब्रजभूषण सिंह यांना मॅनेज केले का??, असा प्रश्न विचारल्यावर पवार काय “हो” असे उत्तर देणार!! म्हणजे संपूर्ण मुलाखतच पद्धतशीरपणे आपला नॅरेटिव्ह सेट करणारी!!

पण या नॅरेटिव्ह सेटिंग मध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडली आहे, त्यावर फारसे कोणी भाषेत केलेले दिसत नाही ती म्हणजे शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांचे पद्धतशीरपणे हिंदुत्वापासून विलगीकरण ही होय!!

– करने को पवार, कहने को ठाकरे

आत्तापर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत हे शिवसेना हिंदुत्ववादीच राहिली आहे. शिवसेनेचे हिंदुत्व बाळासाहेबांना अपेक्षित असणारे आक्रमक हिंदुत्व आहे. त्या देवळात घंटा बडवणारे हिंदुत्व नाही वगैरे बोलत असत. पण कालच्या मुलाखतीत प्रथमच अशी काही उत्तरे दिली गेली की ज्यामुळे बाळासाहेबांचे हिंदुत्वापासून पद्धतशीरपणे विलगीकरण केले गेले!! बाळासाहेब ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. प्रबोधनकार ठाकरे यांनी मांडलेले हिंदुत्व हे बहुजनांचे होते आणि बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे वारसदार आहेत, अशी “नवी” मांडणी कालच्या मुलाखतीत करण्यात आली आहे.

– पवारांच्या नॅरेटिव्ह मध्ये प्रबोधनकार

त्यापलिकडे जाऊन संजय राऊत यांनी प्रबोधनकार ठाकरे समजून घ्यायचे असतील तर शरद पवार यांचे व्याख्यान ठेवा, असे सांगून खुद्द प्रबोधनकारांनाच अलगदपणे पवारांच्या नॅरेटिव्हमध्ये नेऊन सेट करून ठेवले आहे!! म्हणजे इथून पुढे पवार आपला विचार प्रबोधनकारांच्या रॅपरमध्ये गुंडाळून महाराष्ट्रापुढे मांडणार असेच स्पष्ट होते!! आपली कोणतीही राजकीय अथवा सामाजिक कृती ही प्रबोधनकारांच्या विचारातून पुढे आली आहे. प्रबोधनकारांच्या कसोटीवर उतरते आहे, असे सांगत राहणार!! परवा चौंडीच्या कार्यक्रमात नाही का पवारांनी रोहित पवार अहिल्यादेवी यांच्या विचारांमधूनच काम करतो, असे सांगितले होते. असाच प्रकार प्रबोधनकारांच्या बाबतीत घडणार आहे. हे एक प्रकारे “करने को पवार आणि कहने को ठाकरे आणि त्यातही प्रबोधनकार!!” असा मामला असणार आहे.

– बाळासाहेब – पवारांचे राजकीय अंतर

त्यापलिकडचाही मुद्दा इथे महत्त्वाचा आहे तो म्हणजे तिथून पुढे महाविकास आघाडी सरकार करेल ती कृती, पवार सांगतील ते तत्वज्ञान हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा रॅपरमध्ये गुंडाळून दिले जाईल. महाविकास आघाडी सरकार हे बाळासाहेबांच्या इच्छेनुसार घडले आहे असे संजय राऊत म्हणाले आहेतच, पण त्यांना पवार यांनीही दुजोरा दिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेले राजकीय आणि सामाजिक पातळीवरचे मतभेद पवारांनी इतिहास जमा करून टाकले आहेत किंबहुना इतिहासातून पुसून टाकण्याचा हा उत्तम डाव साधला आहे!! बाळासाहेबांनी पवार यांची वैयक्तिक मैत्री ठेवली पण वैचारिक जवळीक कधीच ठेवली नाही हा इतिहास अतिशय चतुराईने पवार आणि राऊत यांनी मुलाखतीतून पुसून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आणि नेमके हेच बाळासाहेबांचे हिंदुत्वापासून पद्धतशीरपणे केलेले विलगीकरण आहे!!

– बाळासाहेबांच्या बाटलीतून पवारांचा डोस

एकेकाळी बाळासाहेबांनी बाबरी मशीद पाडण्याची जबाबदारी शिवसैनिकांनी घेतल्याबद्दल अभिमान दाखवला होता. खटला अंगावर घेतला होता. पण हा इतिहास आता सांगितला जाणार नाही तो काळाच्या पडद्याआड दडवून ठेवला जाईल किंबहुना पुसून टाकला जाईल. त्याऐवजी पवार यांच्या विचारांचा डोस बाळासाहेबांच्या बाटलीत भरून दिला जाईल!! हे कालच्या पवार राऊत संयुक्त मुलाखतीचे खरे इंगित होते. आणि त्यावर कोणी बोलायला तयार नाही!!

– मुख्यमंत्र्यांच्या संभाजीनगर सभेचे टाइमिंग

या मुलाखतीचे राजकीय टाइमिंग याला आणखी एक वेगळे महत्त्व आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 8 जूनला संभाजीनगरात सभा आहे. ते तेथे औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांचे हिंदुत्वापासून विलगीकरण करून उद्धव ठाकरे यांची पंचाईत करून ठेवणे हा देखील मामला यात असू शकतो असा संशय घेण्याला वाव आहे.

– भाजपची वाढ नेमकी झाली कशी?

भाजपच्या वाढी विषयी संजय राऊत आणि सर्व शरद पवार यांनी व्यक्त केलेली मते खरी म्हणजे परस्परविरोधी होती. परंतु त्याची मांडणी प्रसार माध्यमांमध्ये फारशी झाली नाही. किंबहुना प्रसारमाध्यमांनी त्याला फारशी प्रसिद्धी दिली नाही. भाजपच्या वाढीशी शिवसेनेचा काहीही संबंध नाही. भाजपची वाढ ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीने झाली आहे. महाराष्ट्रातल्या विविध आंदोलनांचा फायदा घेत आधीच्या जनसंघाने आणि नंतरच्या भाजपने आपली वाढ केली आहे हे पवारांनी स्पष्ट करून टाकले, तर संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुळे भाजप वाढल्याची मखलाशी केली पण यावर मराठी प्रसार माध्यमांनी चतुराईने भाष्य टाळले.

पण एकूण पवार आणि राऊत यांच्या संयुक्त मुलाखतीतून बाळासाहेबांचे मात्र हिंदुत्वापासून विलगीकरण करण्याचा पद्धतशीर प्रयत्न झाला हे वास्तव दृष्टीआड करता येणार नाही!!

Systematic separation of Balasaheb from Hindutva

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात