प्रतिनिधी
नागपूर : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. दिल्लीत आल्यावर AK47ने उडवून टाकू, अशा भाषेत संजय राऊतांना संदेश पाठवला आहे. याचे सध्या राजकीय वर्तुळात पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्रालयाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असा टोला हाणला, पण या टोल्यावर आता देवेंद्र फडणवीसांनीही सुप्रिया सुळेंना प्रतिटोला हाणला आहे. Supriya sule targets devendra Fadanavis, Fadanavis gave befitting reply to sule over his home ministry
प्रसार माध्यमांसोबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली आहे. त्यामुळे अनेक लोकांना मनातून असे वाटतेय की, मी गृहमंत्री राहिलो नाहीतर बरं होईल. पण मी त्या सगळ्यांना सांगू इच्छितो मी गृहमंत्री राहणार आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री पदाचा पदभार दिलाय. जे चुकीचे आणि बेकायदा काम करतील त्यांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. गृहमंत्री म्हणून यापूर्वी मी 5 वर्षे पद सांभाळले आहे. आता जे लोके बेकायदेशीर काम करतील त्यांना सोडणार नाही. त्यांच्यावर कारवाई होईल. मी कोणाला घाबरत नाही, कोणाला दबतही नाही, जे कायदेशीर आहे तेच करतो, कायद्यानेच वागतो. कायद्यानेच या ठिकाणी राज्य चालेल.’
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?
‘महाराष्ट्रात दंगली होणे ही खूप गंभीर बाब आहे. देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्रालयाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. राज्यातल्या दंगली आणि संजय राऊतांच्या धमकी प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी लक्ष घातले पाहिजे. मी खासदार संजय राऊत यांच्याशी या विषयावर बोलणार आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी देखील बोलणार आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App