विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रिय सुळे यांनी लोकसभेत शून्य प्रहरादरम्यान बोलताना देशातील महागाईवर चिंता व्यक्त केली आहे. देशांतर्गत वाढलेली महागाई आणि त्याचा सर्वसामान्य जनतेवर झालेल्या दुष्परिणामाचा मुद्दा सुप्रिया सुळेंनी मांडला.Supriya Sule raises concerns over inflation
वाणिज्य मंत्रालयानुसार नोव्हेंबर २०२१ मध्ये 39 घाऊक किंमत निदेर्शांक गेल्या वर्षीच्या तुलनेत १४.२३ टक्क्यांनी वाढल्याचे त्यांनी सांगितले. गोडतेल 67 टक्क्यांनी, पामतेल 61 टक्क्यांनी वाढलंय, मूगडाळ 45, उडीदाची डाळ 54 आणि तूर डाळ 49 टक्क्यांनी महाग झाली आहे. आता, देशातील गरिबांनी जगायचं कसं?
असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळेंनी लोकसभेत उपस्थित केला. देशातील बहुतांश राज्य आर्थिक बिकट परिस्थितीचा सामना करत आहेत, त्यातच जीएसटीचा पैसाही राज्यांना वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे, राज्य सरकारला मदत करा, देशातील वाढलेली महागाई कमी करा, वस्तूंच्या किंमती कमी करा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी लोकसभेत केली.
केंद्राकडून राज्याला जीएसटीचे साडेसव्वीस हजार कोटी मिळालेले नाहीत, याकडे लक्ष वेधले असता ह्यजीएसटी काऊन्सिलमध्ये ठरल्याप्रमाणे एक ते दीड महिन्यात पैसे मिळतील, असे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी सांगितले. ते म्हणाले, केंद्र सरकारने यावर्षी ३९ लाख ४५ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला.
मागील वषीर्चा अर्थसंकल्प ३४ लाख ५० हजार कोटी रुपयांचा होता. यंदाच्या अर्थसंकल्पात ५ लाख रुपयांची वाढ झाली. रोजगार, तंत्रज्ञान, प्रधानमंत्री गतिशक्ती योजना, वाहतूक, जलजीवन योजना आदींसाठी भरघोस तरतूद केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App