शिल्पा चव्हाण यांनी विश्रांतवाडी परिसरातील शांतीनगर भागात राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.Suicide by strangulation of female police inspector in Pune police force
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेतील महिला पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.शिल्पा चव्हाण यांनी विश्रांतवाडी परिसरातील शांतीनगर भागात राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आली आहे.
या घटनेमुळं प्रचंड खळबळ उडाली आहे.शिल्पा चव्हाण या सध्या शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी म्हणून काम पहात होत्या.गुन्हे शाखेत नेमणुक होण्यापुर्वी शिल्पा चव्हाण या पुणे शहर पोलिस दलातील विशेष शाखेत कार्यरत होत्या. दरम्यान, चव्हाण यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली आहे हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App