विशेष प्रतिनिधी
पुणे : शिवाजी नगर येथील साखर संकुलातील आयुक्तालयात उभारण्यात येणाऱ्या जागतिक दर्जाच्या साखर संग्राहलय उभारणीबाबत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आढावा घेतला. Sugar Museum Creation in ‘Sakhar Sankul’
साखर आयुक्तालय येथे झालेल्या आढावा बैठकीला साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासह साखर आयुक्तालयाचे संचालक तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिटयुटचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
ऊस उत्पादन, साखर उत्पादन, गुळ, साखरेपासून बनणारे उपपदार्थ याबाबतची माहिती अभ्यागतांना मिळण्यासाठी आणि शेतकरी, पर्यटक, विद्यार्थी तसेच अभ्यासकांना माहितीसाठी साखर संग्रहालय उपयुक्त ठरेल व देशासाठी मानबिंदु ठरेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
ऊस गाळप हंगामाचाही आढावा
सहकारमंत्री पाटील यांनी राज्यातील ऊस गाळप हंगाम 2021-22 चाही आढावा घेतला. यामध्ये एफआरपी, विभागनिहाय तसेच साखर कारखानानिहाय गाळप याबाबतची माहिती घेतली. प्रादेशिक सहसंचालक यांनी आपल्या क्षेत्रातील माहिती सादरीकरणाद्वारे दिली. यावेळी राज्यातील सर्व विभागांचे प्रादेशिक सहसंचालक उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App