‘महाराष्ट्र शासन हाय-हाय, विद्यार्थ्यांकडून निषेध’ : आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाली, टोपेंनी माफीही मागितली; पण विद्यार्थ्यांना आर्थिक-मानसिक झळ बसली त्याचे काय?

Students Across Maharashtra Angry over sudden Cancellation Of Health Department Exams, Protest Against Thackeray Govt

Health Department Exams : बेरोजगारांची सरकारी भरतीसाठी अनेक दिवसांची प्रतीक्षा, लाखो तरुणांच्या आशा अपेक्षा, विद्यार्थ्यांचा वेळ, मेहनत, पैसा या सर्वांवर आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराने पाणी फेरले आहे. दि. 25 व 26 सप्टेंबर 2021 रोजी होणारी आरोग्य विभागाची गट क आणि गट ड संवर्गातील एकूण 6205 पदांसाठी भरती प्रक्रिया अचानक रद्द करण्यात आली आहे. अनेक विद्यार्थ्यांना दूरगावी परीक्षा केंद्रे आली होती. यामुळे अनेक जण आदल्या दिवशीच पोहोचले होते, तर काही जण रात्री प्रवासात होते. अशा वेळी परीक्षेच्या आदल्या रात्री 10च्या सुमारास परीक्षा रद्द झाल्याचे मेसेज विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर धडकले आणि एकच गोंधळ उडाला. Students Across Maharashtra Angry over sudden Cancellation Of Health Department Exams, Protest Against Thackeray Govt


विशेष प्रतिनिधी

मुंबई : बेरोजगारांची सरकारी भरतीसाठी अनेक दिवसांची प्रतीक्षा, लाखो तरुणांच्या आशा अपेक्षा, विद्यार्थ्यांचा वेळ, मेहनत, पैसा या सर्वांवर आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराने पाणी फेरले आहे. दि. 25 व 26 सप्टेंबर 2021 रोजी होणारी आरोग्य विभागाची गट क आणि गट ड संवर्गातील एकूण 6205 पदांसाठी भरती प्रक्रिया अचानक रद्द करण्यात आली आहे. अनेक विद्यार्थ्यांना दूरगावी परीक्षा केंद्रे आली होती. यामुळे अनेक जण आदल्या दिवशीच पोहोचले होते, तर काही जण रात्री प्रवासात होते. अशा वेळी परीक्षेच्या आदल्या रात्री 10च्या सुमारास परीक्षा रद्द झाल्याचे मेसेज विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर धडकले आणि एकच गोंधळ उडाला.

विद्यार्थ्यांना आर्थिक झळ, मनस्ताप

राज्य सरकार विद्यार्थ्यांबाबत पुरेसं गंभीर नाही का, असा प्रश्न वेळोवेळी उपस्थित होत आहे. एमपीएससी उत्तीर्ण करणारा तरुण स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येची घटना ताजी असूनही सरकारने यातूनही काहीही बोध घेतला नसल्याचे सिद्ध होतंय. अनेक विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रे ही 500 ते 600 किमी अंतरावर होती, परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क, प्रवासासाठीचा खर्च असा किमान काही हजारांचा खर्च केलेला आहे. एवढे करूनही नियोजित परीक्षाच रद्द झाल्याने सर्व विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

आरोग्यमंत्र्यांचे सकाळीच सर्वकाही आलबेल असल्याचे ट्वीट

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल सकाळी 10 वाजून 18 मिनिटांनी ट्वीट केले की, “आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड संवर्गातील एकूण 6205 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. भरती प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली जात आहे. परीक्षार्थींनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.”
या ट्वीटच्या काही तासांनीच विद्यार्थ्यांना परीक्षा रद्द झाल्याचे मेसेजेस यायला सुरुवात झाली. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांबरोबरच विरोधी पक्षानेही सरकारच्या कारभाराचा निषेध नोंदवला आहे. राजेश टोपे यांनी स्वत: रात्री 12 वाजून 20 मिनिटांनी परीक्षा रद्द झाल्याबाबत ट्वीट केले आहे.

आरोग्य विभागाने परीक्षा रद्द होण्याचे काय कारण दिले?

याबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, “आरोग्य विभागाचा प्रमुख म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो, परीक्षार्थींची माफी मागतो. 25 आणि 26 सप्टेंबरला सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत गट क आणि गट ड या प्रवर्गातील होऊ घातलेल्या परीक्षा बाह्यस्रोत संस्था ‘न्यासा’ यांच्या अकार्यक्षमतेमुळे पुढे ढकलण्यात येत आहे. ही परीक्षा घेण्य़ासाठी न्यासाची निवड करण्यात आली. त्यासाठी करार करण्यात आला. या करतात स्पष्ट उल्लेख करण्यात आला की, आरोग्य विभागाची जबाबदारी फक्त आणि फक्त प्रश्नपत्रिका तयार करण्याइतपतच आहे. आरोग्य विभागानं तयार केलेल्या प्रश्नपत्रिकांची छपाई करणे, त्या परीक्षा केंद्रावर पोहोचवणे, हॉल तिकीट देणे, परीक्षा केंद्र तयार करणे, तेथील व्यवस्था बघणे, कोरोनाच्या दृष्टीनं काळजी घेणे, संस्थेची जबाबदारी होती. पण, या तयारीत या संस्थेची दिरंगाई दिसत होती. ती त्यांच्या लक्षात आणून दिली जात होती आणि ते वेळोवेळी खात्री देत होते. यानंतर मी स्वत: परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला आणि काल संध्याकाळपर्यंत (23 सप्टेंबर) सगळ्या व्यवस्था झाल्या पाहिजे असा अल्टिमेटम दिला. त्यांनी तशी खात्रीसुद्धा दिली. पण परभणीच्या दौऱ्यावर असताना मला या तयारीत काही त्रुटी जाणवल्या. याप्रकरणी आढावा घेण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना सांगितलं तेव्हा यात बऱ्याच त्रुटी असल्याचं निदर्शनास आलं. परीक्षेची तारीख चर्चा करून लवकरात लवकर ठरवण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत आम्ही एखाद्या आठवड्याभरात नवीन तारीख देऊ.”

आरोग्यमंत्री टोपेंनी हा व्हिडिओ पाहिलाय का?

https://twitter.com/MokasheAmit/status/1441478006606688266?s=20

राजेश टोपे यांच्या ट्विटला उत्तर देताना प्रवासात असलेल्या एका परीक्षार्थीनं काल रात्रीत व्हिडिओ ट्वीट केलाय. हा विद्यार्थी परीक्षा केंद्राकडे जाण्यासाठी एसटीतून प्रवास करत होता.

या व्हिडिओतील विद्यार्थी म्हणतोय की, “उद्या सकाळी 9 वाजता परीक्षा केंद्रावर आम्हाला पोहोचायला सांगितलंय. आता प्रवासात असताना रात्री 10 वाजता परीक्षा रद्द झाली असं आम्हाला सांगत असाल तर अशावेळी आम्ही काय करावं? आम्ही 600 ते 700 किलोमीटर अंतरावरून आलोय. चाच-चार, पाच-पाच हजार रुपये खर्च केलाय. फॉर्म भरण्यासाठी आमचे पैसे खर्च झाले. पण असंच जर चालणार असेल तर आम्ही काय करायला पाहिजे?” यानंतर या व्हिडिओतील सर्व विद्यार्थी ठाकरे सरकारचा आणि आरोग्य विभागाचा ‘हाय हाय’च्या घोषणा देत निषेध करताना दिसत आहेत.

काय म्हणाले विरोधक?

भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी ट्विट करत म्हटलंय, “आघाडीच्या महागोंधळाचा उच्चांक. आरोग्य विभागाची उद्या होऊ घातलेली परीक्षा रात्री 10 वाजता मेसेज पाठवून रद्द केली. बरेच जण परीक्षेच्या ठिकाणी पोहचलेसुद्धा आहेत. या मनस्तापाची आणि देव न करो पण कोणी स्वप्निलसारखं टोकाचं पाऊल उचललं तर त्याची जबाबदारी मुख्यमंत्री घेणार की आरोग्यमंत्री?”

हा मुद्दा तापणार, यावर चर्चा-राजकारण होणार; पण विद्यार्थ्यांची मेहनत, गेलेला पैसा, गेलेली वेळ परत येणार आहे का? फक्त दिलगिरी मागितल्याने विद्यार्थ्यांचा मनस्ताप कमी होणार आहे का? याआधीच्याही भरती परीक्षांमध्ये गोंधळाचे अनेक प्रकार समोर आलेले आहेत. यामुळे सरकार विद्यार्थ्यांकडे गांभीर्याने पाहणार कधी? हा खरा प्रश्न आहे.

Students Across Maharashtra Angry over sudden Cancellation Of Health Department Exams, Protest Against Thackeray Govt

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात