कोल्हापूरातील कंजारभाट समाजातील जातपंचायतीचा अजब फतवा, कौमार्य परीक्षेत फेल झाल्याने दोन बहिणींना घ्यायला लावली काडीमोड

कोल्हापूर येथे कंजारभाट समाजाच्या जातपंचायतीने अजब फतवा काढला आहे. कौमार्य परीक्षेत फेल झाल्याने पंचायतीने दोन बहिणींना काडीमोड म्हणजे घटस्फोट घ्यायला लावला.Strange fatwa of caste panchayat of Kanjarbhat community in Kolhapur, two sisters forced to take divorce after one failing in virginity test


विशेष प्रतिनिधी 

कोल्हापूर : कोल्हापूर येथे कंजारभाट समाजाच्या जातपंचायतीने अजब फतवा काढला आहे. कौमार्य परीक्षेत फेल झाल्याने पंचायतीने दोन बहिणींना काडीमोड म्हणजे घटस्फोट घ्यायला लावला.दोन सख्ख्या बहिणींची लग्नानंतर कौमार्य परीक्षा घेतली असता त्यातील एक बहीण कौमार्य परीक्षेत फेल गेली.त्यामुळे सासरच्या लोकांनी या दोघींनाही नांदवण्यास नकार दिला.त्यांना त्यांच्या घरी पाठवून देण्यात आले. सत्तावीस तारखेला कोल्हापूर येथे राजारामपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मंदिरात जात पंचायत बसण्यात आली आणि त्यामध्ये पंचा समोर या दोघीना उभी  करण्यात आले.

बाभळीचे लाकूड आणून ते त्यांच्यासमोर कापले आणि या दोघींचा काडीमोड झाला असे कारण सांगून मुलींचे लग्न मोडण्यात आले. यापुढे या दोन्ही मुलींचा काहीही संबंध नाही असे पंचांच्या समोर सर्वांना सांगण्यात आले.

उदरनिर्वाहासाठी भटकत असताना गटातल्या स्त्रीला बंधनात ठेवण्यासाठी कौमार्य चाचणीची कुप्रथा सुरू झाली. मात्र एकविसाव्या शतकातही अनेक जण ही कुप्रथा पाळतात.
लग्न झाल्यावर नवरा बायको यांना एका खोलीत पाठविण्यात येते.

बाहेर आल्यावर माल खरा की खोटा अशी नवऱ्या मुलाला विचारणा पंचमंडळीकडून केली जात होती. मात्र आता ही विचारणा करताना नवऱ्या मुलाला तू समाधानी आहेस का? असल्यास तीन वेळा समाधानी आहे असं बोलं, असे सांगितले जाते.

याविरोधात ‘स्टॉप दी व्ही रिच्युअल’ ही मोहीम विवेक तमायचीकर आणि काही तरुणांनी एकत्र येऊन सुरू केली. विवेक आणि ऐश्वर्या यांनी स्वतःही लग्नामध्ये कौमार्य परीक्षा न देता हा पायंडा मोडून काढला.

विवाह, लैंगिकता, परस्पर विश्वास या सगळ्या पती-पत्नीमधल्या वैयक्तिक बाबी आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ‘राइट टू प्रायव्हसी’चा मुद्यावर भाष्य केले आहे. त्या आधारे या अनिष्ट प्रथेविरोधात सोशल मीडियामधून ‘स्टॉप व्ही टेस्ट’ हे अभियान सुरू करण्यात आले. या मोहिमेला पाठिंबा देणाऱ्या युवांना या जोखडातून मुक्त व्हायचे आहे, असे विवेक यांनी सांगितले.

Strange fatwa of caste panchayat of Kanjarbhat community in Kolhapur, two sisters forced to take divorce after one failing in virginity test

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*